मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त लोकांच्या घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होऊ लागलं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचं आगमन कालपासूनच (१८ सप्टेंबर) सुरू झालं आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पा लोकांच्या घरोघरी विराजमान झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना सुरू आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया!” असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच गणपती बाप्पाचं दर्शन घेतानाचा एक फोटोदेखील मोदी यांनी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी काढलेला फोटो मोदी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

गणेशोत्सव हा जगभर साजरा केला जाणारा सण असला तरी हा महाराष्ट्राचा आणि मराठी बांधवांचा प्रमुख सण आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरादेखील याच महाराष्ट्राने देशाला दिली आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेत ट्वीट करत देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. इतर राज्यांमधील सणांच्या वेळी पंतप्रधान मोदी त्या-त्या राज्यात बोलल्या जाणाऱ्या भाषेत शुभेच्छा देत असतात.

हे ही वाचा >> महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मत्रिमंडळाची मंजुरी, आज लोकसभेत मांडण्याची शक्यता

दरम्यान, देशभरात बॉलिवूड सेलिब्रेटी, कलाकार, खेळाडू आणि राजकीय नेत्यांच्या घरीदेखील लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या घरी काल रात्रीच गणरायाचं आगमन झालं. या दोन्ही कलाकारांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.