Ganesha Idol : गणेश उत्सव सध्या महाराष्ट्रासह देभरात उत्साहाने सुरु आहे. गणपती बाप्पा ७ सप्टेंबरला घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झाले आहेत. काही ठिकाणी पाच दिवस, सहा दिवस, सात दिवस गणपतीचं आगमन होतं. बहुतांश सार्वजनिक मंडळांमध्ये १० दिवस म्हणजेच गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा दहा दिवसांसाठी बाप्पा विराजमान होतात. मात्र विसर्जन मिरवणुकीत तणाव निर्माण झाल्याने गणपती बाप्पाची मूर्ती पोलिसांनी जप्त केली. तर गणपती बाप्पा पोलिसांच्या व्हॅनमध्ये काय करत आहेत असा प्रश्न भाजपा नेत्याने उपस्थित केला आहे.

कुठे घडली ही घटना?, पांचजन्यचा आरोप काय?

कर्नाटकात ही घटना घडली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या वेळी हिंदू मुस्लीम तणाव निर्माण झाला. ज्यानंतर पोलिसांनी गणपतीची मूर्ती जप्त केली. (Ganesha Idol ) पांचजन्य या संघाच्या मुखत्राने गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे तेजस्वी सूर्या यांनी ही मूर्ती पोलिसांच्या व्हॅनमध्ये पाहून दुःख झाल्याचं म्हटलं आहे. कर्नाटकात पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांना अटक केली. गणेश विसर्जनाच्या वेळी जी दगडफेक झाली त्याचा विरोध करणाऱ्या हिंदूंना अटक करण्यात आली. दगडफेकीच्या घटनेची NIA कडून चौकशी व्हावी अशी मागणी हे हिंदू बांधव करत होते. त्यानंतर हिंदू कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली तर आणि गणपतीची मूर्ती जप्त करण्यात आली. तर भाजपा नेते तेजस्वी सूर्या यांनी गणपती बाप्पा पोलिसांच्या व्हॅनमध्ये काय करत आहेत असा प्रश्न विचारला आहे. हे चित्र अत्यंत वाईट वाटणारं आणि दुर्दैवी आहे अशा आशयाची पोस्टही तेजस्वी सूर्या यांनी केली आहे.

Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mumbai ravi raja
मुंबई : भांडवली खर्चावरून पालिकेवर आरोप, कंत्राटदारांसाठी तिजोरी खुली केल्याचा रवी राजा यांचा आरोप
Anjali Damania
“…तर संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते”, अंजली दमानिया यांचं पोलीस चार्जशीटमधील महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट
friend request, Facebook , Complainant woman,
तक्रारदार महिलेला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट? उच्च न्यायालयाचे तपास अधिकाऱ्यांच्या कृतीवर ताशेरे
government land sale controversy report against female tehsildar news in marathi
बापरे..! महिला तहसीलदाराकडून चक्क शासकीय भूखंडांची विक्री; निलंबन केल्याखेरीज चौकशी अशक्यः एसडीओ डव्हळे
Jitendra Awhad
Jitendra Awhad : Video : घरावर पोलिसांची पाळत? पत्रकार परिषदेत घुसून चित्रीकरण केल्याचा आरोप; जितेंद्र आव्हाड संतापले; नेमकं काय घडलं?
walmik karad surrendered
Video: वाल्मिक कराडच्या ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “एवढी हिंमत कशी होते?”

हे पण वाचा- Karnataka : गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत राडा; दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर तणाव, जमावबंदी लागू

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी देशाच्या इतिहासात ही अशी घटना पहिल्यांदाच घडली असावी असं म्हटलं आहे आणि या प्रकरणावरुन भाजपाने काँग्रेस सरकारवर आरोप केले आहेत.

मंड्या या ठिकाणी नेमकं काय घडलं?

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात गणेशोत्सवाला गालबोट लागलं. मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवारी रात्री आठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यानंतर दोन गटांत दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळीची घटनाही घडली. या घटनेमुळे मंड्या जिल्ह्यात तणाव निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला होता. ज्यानंतर आता ही घटना समोर आल्याचं पांचजन्यने म्हटलं आहे.

Ganesha Idol Arrested Said Panchjanya
कर्नाटकातला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (फोटो सौजन्य-पांचजन्य, एक्स पेज)

दगडफेकीच्या आणि जाळपोळीच्या घटनेत काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच दगडफेकीच्या घटनेवेळी मोठा जमाव एकत्र आल्यामुळे पोलिसांना बळाचा सौम्य वापर करावा लागला. तसंच जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली गेली. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे.

Story img Loader