मध्य प्रदेशमध्ये एका अल्पवयीन मुलीवर मंदिर व्यवस्थापन समितीतील दोन सदस्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संतापजनक म्हणजे आरोपींनी अत्याचारानंतर मुलीच्या गुप्तांगांमध्ये लाकूड घातलं. ही घटना मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यातील एका गावात घडली. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सतना जिल्ह्यातील शारदा देवी मंदिर व्यवस्थापन समितीतील अतुल कुमार भदोलिया आणि रवी कुमार या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी २७ जुलैला दुपारपासून बेपत्ता होती. त्यानंतर ती रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी आली आणि कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत आरोपींविरोधात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नेमकं काय घडलं?

मंदिर व्यवस्थापन समितीतील दोन सदस्यांनी पीडित मुलीला फसवून डोंगरावर नेलं. त्या ठिकाणी या दोन आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत पीडित मुलगी घरी आली आणि तिने कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ही घटना उघड झाली.

हेही वाचा : आधी नग्न करत धिंड काढली, मग सामूहिक बलात्कार; मणिपूरमधील पीडितेचे धक्कादायक खुलासे, म्हणाली…

या घटनेनंतर मंदिर व्यवस्थापनाने दोन्ही आरोपींना समितीतून हटवलं आहे. या आरोपींमुळे मंदिर व्यवस्थपान समितीची प्रतिमा मलिन होत आहे, असंही सांगण्यात आलं आहे. आरोपी रविंद्र कुमारचा मंदिर समितीत समावेश होता, तर आरोपी अतुल भदोलियाचा माँ शारदा वन विभाग गोशाळा समितीत समावेश होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang rape of minor girl in madhya pradesh by temple management committee member pbs