Gang Rape : १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर धावत्या रुग्णवाहिकेत बलात्कार ( Gang Rape ) करण्यात आला आहे. या मुलीच्या मामे बहिणीच्या नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला. तसंच त्यानंतर रुग्णवाहिका चालकाने तिच्यावर बलात्कार ( Gang Rape ) केला. ही अत्यंत धक्कादायक म्हणावी अशी घटना समोर आली आहे. १६ वर्षांच्या मुलीच्या मामादेखत ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून पीडितेच्या मामाचा शोध पोलीस घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी ही घटना कुठे घडली?

२२ नोव्हेंबरला मध्य प्रदेशातल्या हनुमान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडितेने चार जणांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. त्यापैकी एक तिचे काकाही आहेत. पीडितेने मामा, तिची बहीण, मामे बहिणीचा नवरा आणि रुग्णवाहिका चालकाच्या विरोधात तक्रार ( Gang Rape ) केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर या चौघांविरोधात पोलिसांनी FIR दाखल केली आहे. २७ नोव्हेंबरला या प्रकरणातील पीडितेच्या बहिणाचा नवरा आणि रुग्णवाहिका चालक या दोघांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीचा मामा आणि तिची मामे बहीण फरार आहेत त्या दोघांचा शोध पोलीस घेत आहे.

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जननी एक्स्प्रेसमध्ये रुग्णवाहिका चालक पंडीत याला एक एक फोन आला. हा फोन लासा गावातील एका रुग्णासंदर्भात होता. लासा हे गाव हनुमान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं. पंडीत जेव्हा रुग्णवाहिका घेऊन लासा गावात गेला तेव्हा त्यात पीडितेची मामे बहीण, तिचा नवरा हे सगळे त्यांच्याबरोबर होते. कारण लासा हे पीडितेच्या मामे बहिणीचं माहेर आहे.

हे पण वाचा- चार राज्यात बलात्कार, खून करणारा ‘सीरियल किलर’ गुजरातमध्ये जेरबंद; एकट्या महिलांना बनवायचा सावज

पीडितेने काय सांगितलं?

पीडितेने जी तक्रार दिली आहे त्यात सांगितल्याप्रमाणे २२ नोव्हेंबरला मामांची मुलगी माझ्या घरी आली. तिने मला तिच्या घरी येण्यासाठी म्हणजेच तिच्या सासरी येण्यासाठी आग्रह केला. ज्यानंतर पीडिता तिच्या घरी जाण्यासाठी तयार झाली. यानंतर सगळे त्या रुग्णवाहिकेत बसले. यावेळी मामे बहीण, तिचा नवरा आणि रुग्णवाहिका चालक पंडीत हे सगळे बसलेले होतेच. रुग्णवाहिकेत पुढच्या सीटवर मुलीचे मामा आणि त्यांचा जावई असे दोघं बसले होते. त्यानंतर काही वेळ प्रवास केल्यावर या मुलीची बहीण पाणी हवं आहे म्हणून ते आणायला खाली उतरली. ज्यानंतर तिचा नवरा मागच्या सीटवर म्हणजेच जिथे पीडिता बसली होती तिथे येऊन बसला. रात्र झाली होती आणि चालक डोंगरभाग असलेल्या भागांतून रुग्णवाहिका घेऊन चालला होता. याचवेळी चालकाने आणि पीडितेच्या बहिणीच्या नवऱ्याने तिच्या मामांच्या देखत तिच्यावर बलात्कार ( Gang Rape ) केला. रुग्णवाहिका चालकाने आणि पीडितेच्या बहिणीच्या नवऱ्याने तीनवेळा या पीडितेवर बलात्कार केला. पहाटे पाचच्या सुमारास या मुलीला तिच्या घराच्या जवळच्या परिसरात तसंच टाकण्यात आलं. त्यानंतर पीडिता घरी आली. तिने घडलेला सगळा प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर पीडितेच्या आईने आपली बदनामी होईल जे झालं ते कुठे बोलू नकोस असं त्या मुलीला सांगितलं. मात्र या मुलीला चिड आलेली होती. घडल्या प्रकाराबाबत तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. ज्यानंतर २५ नोव्हेंबरला FIR नोंदवण्यात आली. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी आणखी काय सांगितलं?

हनुमान पोलीस ठाण्याचे प्रमुख अनिल काकडे यांनी सांगितलं की पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर ( Gang Rape ) आम्ही गुन्हा नोंद केला आहे. दोन दिवसांत आम्ही या प्रकरणातल्या दोन आरोपींना अटक केली. आता या मुलीचा मामा आणि त्यांची मुलगी या दोघांचा शोध आम्ही घेत आहोत. ज्या रुग्णवाहिकेत मुलीवर बलात्कार करण्यात आली ती रुग्णवाहिकाही जप्त करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang rape on 16 year old girl by cousin husband and driver in moving ambulance in mp scj