गंगा शुद्धीकरणावरुन रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते आणि जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा शुद्धीकरणासंदर्भात दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. नदीचे पाणी पूर्णपणे दुषित झाले आहे’, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजेंद्र सिंह हे गंगा सद्भावना यात्रेनिमित्त कोलकात्यात असून बुधवारी त्यांनी कोलकात्यात पत्रकारांशी संवाद साधला. गंगा नदीच्या वादावर ते म्हणाले, मोदींच्या काळात भांडवलशाहीवर आधारित लोकशाही आहे. लोकांना नदीत निर्माल्य टाकल्यास अटक होते, पण कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात गंगा नदीत दुषित सांडपाणी सोडले जाते. अशा कंपन्यांवर काहीच कारवाई होत नाही, असे त्यांनी नमूद केले.

गंगा नदी आयसीयूत असून नमामी गंगे या योजनेमुळे नदीचे शुद्धीकरण होऊ शकलेले नाही. या योजनेअंतर्गत गंगा घाटांचा पुनर्विकास करण्यात आला. पण गंगा नदीचे शुद्धीकरण हे अजूनही स्वप्नच आहे, असे त्यांनी सांगितले. मोदींनी आधी गंगा नदी माते समान असल्याचे सांगितले. ३ महिन्यात गंगा नदीचे शुद्धीकरण सुरु करण्याचे आश्वासन दिले. पण अजूनही त्यांनी काहीच केले नाही. गंगा नदीची अवस्था आजही दयनीय आहे, असे त्यांनी सांगितले.

गंगा सद्भावना यात्रा उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमार्गे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे पोहोचली. १११ दिवसांत जवळपास अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करुन ही यात्रा कोलकात्यात पोहोचली आहे. या यात्रेदरम्यान गंगा किनारी वसलेल्या गावांमध्ये नदीच्या रक्षणासंदर्भात जनजागृती करण्यात आली.