गेले तेरा दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडित तरूणीचा आज (शनिवारी) पहाटे मृत्यू झाला. तिचा मृतदेह आज रात्रीपर्यंत एका विशेष विमानाने भारतात पाठविण्यात येणार असल्याची माहिती सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त टी. सी. ए. राघवन यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेली पीडित तरूणीच विविध व्याधींशी झुंज देत असताना आज पहाटे सव्वादोनच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राघवन म्हणाले, की पीडित तरूणीच्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह भारतात नेण्याची इच्छा आहे. त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करून एका विशेष विमानाने तिचा मृतदेह भारतात पाठवण्यात येणार आहे.
राजधानी दिल्लीत भरधाव बसमध्ये १६ डिसेंबरला सहा जणांनी ‘त्या’ तरूणीवर बलात्कार करून, मारहाण करत बसमधून फेकून दिले होते. तेव्हापासून ती मृत्यूशी झुंज देत होती. सुरूवातीला तिच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वीच तिला उपचारासाठी सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा