गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या गराड्यात असणाऱ्या या दोघांवर हल्लेखोरांनी गोळीबार केलाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत तीन जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली असली, तरी हे सगळं घडलं तरी कसं? याविषयी अजूनही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एखाद्या चित्रपटातील सीन वाटावा, अशाच या घडामोडी घडल्या!

नेमकं घडलं काय?

अतिक अहमदच्या मुलाचं तीन दिवसांपूर्वीच म्हणजे १३ एप्रिल रोजी एन्काऊंटर करण्यात आलं होतं. त्यावरून उत्तर प्रदेशमध्ये सामान्य नागरिकांपासून राजकीय वर्तुळापर्यंत जोरदार चर्चा सुरू झाली होती. अशातच अवघ्या तीन दिवसांच्या अंतराने खुद्द अतिक अहमदचीच अशा प्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे त्यावरून मोठा गदारोळ सुरू झाला आहे. अनेक गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या अतिक अहमदला वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराजमध्ये आणलं जात असताना पोलीस व्हॅनमधून उतरताच अतिकला माध्यम प्रतिनिधींनी गराडा घातला!

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

अतिक अहमदला त्याच्या मुलाच्या अंत्ययात्रेला जाण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली होती. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींनी सर्वात आधी अतिकला त्याचसंदर्भात प्रश्न विचारला. यावेळी त्याच्या आसपास किमान १० ते १२ पोलिसांना गराडा होता. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना अतिक म्हणाला, “आता त्यांनी मला नाही जाऊ दिलं तर नाही जाऊ दिलं, काय करणार?” अतिकचं हे उत्तर संपलं आणि त्याच्या डाव्या बाजूने एक पिस्तुल त्याच्या डोक्यावर ठेवल्याचं दृश्यांमध्ये दिसलं आणि गोळ्या झाडण्याचा आवाज झाला.

पत्रकारानं सांगितल्या प्रत्यक्ष घडामोडी!

दरम्यान, प्रयागराजमध्ये घडलेल्या या सगळ्या थरारक घडामोडींचा प्रत्यक्षदर्शी अनुभव पीटीआयचे पत्रकार पंकज श्रीवास्तव यांनी सांगितला आहे. “प्रयागराजमध्ये अतिक अहमद आणि अशरफला मेडिकल चेकअपसाठी आणलं होतं. माझ्यासोबत अजून काही पत्रकार होते. आम्ही त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी अचानक अनेक गोळ्या झाडल्या गेल्या. अतिक अहमद आणि अशरफ दोघं जमिनीवर पडले. ऑन द स्पॉट त्यांचा मृत्यू झाला. आम्हालाही थोडी जखम झाली”, असं श्रीवास्तव म्हणाले.

पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालून दिल्या घोषणा, पोलीस म्हणाले…

“किमान १५ ते २० गोळ्या झाडल्या गेल्या. ३ ते ४ हल्लेखोर होते. आमच्या एका सहकाऱ्यानं मला धक्का दिला. त्यामुळे मी खाली पडलो आणि गोळी माझ्या डोक्यावरून निघून गेली. त्यामुळे माझा जीव वाचू शकला. पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणी तीन लोकांना अटक केली आहे. आत्तापर्यंत दोन पिस्तुलं ताब्यात घेण्यात आली आहेत”, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली आहे.

अतिक अहमदची अशा प्रकारे हत्या केल्यामुळे राजकीय वर्तुळातून सध्या उत्तर प्रदेश सरकारवर टीका-टिप्पणी केली जात आहे.

Story img Loader