पंजाबी गायक आणि सिद्धू मुसेवाला याचे वडील बलकौर सिंह राजकारणात येऊ शकतात. बलकौर सिंह मुलाच्या हत्येप्रकरणी न्याय मागत आहेत. पण, त्यांच्या तक्रारीनंतर अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील निर्दोष लोकांवरही गुन्हे दाखल केले आहेत, असा खुलासा मुसेवाला हत्याप्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने केला आहे.

‘एबीपी न्यूज’च्या ‘ऑपरेशन दुर्दांत’ अंतर्गत लॉरेन्स बिश्नोईची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत सिद्धू मुसेवालाच्या वडीलांना दिलेली धमकी, हत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांना धमकीची पत्र दिलं होतं का? याबद्दल बिश्नोईला विचारण्यात आलं. त्यावर सांगितलं की, “असं कोणतंही पत्र त्यांना दिलं नाही. अन्य कोणी त्यांना पत्र लिहलं असेल तर, त्याची माहिती नाही. सिद्धूच्या कुटुंबाला आम्ही लक्ष्य केलं नाही. तरीही सिद्धूचे वडील आमच्याविरोधात बोलत आहेत.”

हेही वाचा : “सलमान खानने पैशांचं आमिष दाखवलं होतं, परंतु…”, धमकी देताना लॉरेन्स बिश्नोईचा मोठा दावा

“वडीलांशी देणं-घेणं नाही”

“गुरूलाल आणि विक्की हे माझे भाऊ होते. त्यांचा खून प्रकरणात सिद्धू मुसेवालाचा हात होता. च्याच्या कुटुंबाशी आमचे कोणतेही मतभेद नाही. सिद्धू मुसेवालाला प्रत्युत्तरात आमच्या भावांनी मारलं असेल. त्याच्या वडीलांशी आम्हाला देणं-घेणं नाही,” अशी स्पष्टोक्ती लॉरेन्स बिश्नोईने दिली आहे.

हेही वाचा : “पंजाबी गायक व कलाकारांकडून गँगस्टर पैसे घेतात का? ” लॉरेन्स बिश्नोई उत्तर देत म्हणाला, “बॉलिवूडप्रमाणे…”

“सिद्धूच्या मृत्यूचं प्रकरण सीबीआयकडे गेलं तर…”

“बलकौर सिंह यांना निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे ते वातावरण निर्माण करण्याचं काम करत आहे. मुलाच्या मृत्यूनंतर ते रॅली काढत आहेत. सिद्धूच्या हत्येप्रकरणी ५० जणांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण सीबीआय चौकशीसाठी गेलं तर १० लोकंही यात राहणार नाही. १८०० पानांच चार्जशीट बनवलं आहे. पण, सीबीआय चौकशी झाली तर अनेक लोक निर्दोष सुटतील,” असा दावा लॉरेन्स बिश्नोईने केला आहे.

Story img Loader