गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात आहे. त्याची एनआयएकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान बिश्नोईने मोठा खुलासा केला आहे. लॉरेन्सने सांगितलं की, अनेक नेते, व्यावसायिक त्याला धमकी देणारे कॉल करण्यासाठी स्वतःच पैसे देतात. ही मंडळी पोलीस सुरक्षा मिळावी यासाठी असं करतात. बिश्नोईला खलिस्तानी संघटनांकडून झालेल्या फंडिंगप्रकरणी एनआयएकडून त्याची चौकशी सुरू असताना बिश्नोईने ही माहिती दिली. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या पंजाबमधल्या बठिंडा येथील तुरुंगात कैद आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिश्नोईने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, तो मद्य विक्रेते, कॉल सेंटर्सचे मालक, अंमली पदार्थ विकणारे, बांधकाम व्यावसायिकांकडून दर महिन्याला २.५ कोटी रुपयांची खंडणी वसूल करत होता. तसेच त्याने सांगितलं की, अलिकडच्या काळात त्याला अनेक नेत्यांनी, व्यावसायिकांनी धमकी देणारे कॉल करण्यासाठी पैस दिले आहेत. पोलीस सुरक्षा मिळावी यासाठी हे लोक मला पैसे देऊन धमकी देणारे कॉल करायला सांगतात.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
Vivek Oberoi
“मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे”, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या रिलेशनशिपच्या…”
lawrence bishnoi salman khan
Lawrence Bishnoi: “बिश्नोई को बुलाऊं क्या?” सलमान खानच्या शूटिंगमध्ये घुसून अज्ञाताची धमकी, पोलिसांनी घेतलं ताब्यात!
asid kumar modi palak sidhwani tmkoc
TMKOC : सोनूची भूमिका करणाऱ्या पलक सिधवानीच्या आरोपांना असित मोदींचे प्रतिउत्तर म्हणाले, “तिचे मानधन…”
supreme Court
Supreme Court : “आम्ही जामीन दिला नी लगेच तुम्ही मंत्री झालात?”, आर्थिक अफरातफरीच्या आरोपीवर सुप्रीम कोर्ट लक्ष ठेवणार!
eknath shinde shivsena mla sanjay gaikwad allegations on bjp senior leaders in vidhan sabha election print politics news
सत्ताधारीच प्रतिस्पर्धी पक्षाचे उमेदवार ठरवतात का ?गायकवाड, शेळकेंच्या आरोपाने नव्या चर्चेला तोंड

बिश्नोईने सांगितलं की, त्याच्या बिझनेस मॉडेलमध्ये अनेक सहकारी आहेत. त्याचे हे साथीदार अनेक तुरुंगांमध्ये कैद असलेले गँगस्टर्स आहेत, जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत. उत्तर प्रदेशात धनंजय सिंह, हरियाणात काला जठेरी, राजस्थानमध्ये रोहित गोरा आणि दिल्लीतल्या तुरुंगात कैद असलेले रोहित मोई आणि हाशिम बाबा यांचा समावेश आहे.

हे ही वाचा >> गायक सिद्धू मुसेवालाची हत्या का केली? गँगस्टर गोल्डी ब्रारने सांगितलं कारण, म्हणाला…

सलमान खान धमकी प्रकरणी बिश्नोईने सांगितलं की, १९९८ मध्ये सलमानचं नाव काळवीट शिकार प्रकरणात पुढे आलं तेव्हापासून सलमान माझ्या निशाण्यावर आहे. खरंतर बिश्नोई समाजात हरीण-काळवीट या प्राण्यांना खूप पवित्र मानलं जातं. बिश्नोई म्हणाला जर सलमानने माफी मागितली तर आम्ही त्याला माफ करू.

Story img Loader