गायक सिद्धु मुसेवाला हत्याप्रकरणात तुरुंगात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या तपास यंत्रणेला त्याने १० जणांची यादीच सांगितली आहे. हे १० जण त्याच्या रडारवर होते, असं त्याने आपल्या कबुली जबाबात म्हटलं आहे. या यादीत बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खान याच्यासह काही कुप्रसिद्ध गँगस्टरचीही नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धू मुसेवाला याची हत्या झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला होता. एका मुलाखतीत त्याने सलमान खानची हत्या करणार असल्याचे खुलेआम जाहीर केले होते. त्यानंतर, राष्ट्रीय तपास यंत्रणेला दिलेल्या जबाबातही त्याने हा खुलासा केला आहे. सलमान खानसहित दहा त्याच्या रडारवर असल्याचं त्याने आपल्या जबाबात म्हटलं आहे. यामध्ये सिद्ध मुसेवाला याचा मॅनेजर शगुनप्रीत याचाही समावेश आहे.

हत्येच्या यादीत या दहा जणांचा नंबर

१. सलमान खान (बॉलीवूड अभिनेता)
२. शगुनप्रीत (सिद्ध मुसेवाला याचा मॅनेजर)
३. मनदीप धालीवाला (लक्की पटियालचा अनुयायी)
४. कौशल चौधरी (गँगस्टर)
५. अमित डागर (गँगस्टर)
६. सुखप्रीत सिंह बुद्धा (बमबिहा गँगचा प्रमुख)
७. लक्की पटियाल (गँगस्टर)
८. रम्मी मसाना (गौंडर गँगचा समर्थक)
९. गुरप्रीत शेखो (गौंडर गँगचा समर्थक)
१०. भोलू शूटर, सनी लेफ्टी, अनिल लठ (विक्की मुद्दुखेडाचे मारेकरी)

विक्की मुद्दुखेडाची हत्या झाल्याने लॉरेन्स बिश्नोई संतापला होता. या हत्येत सिद्ध मुसेवालाचा हात असल्याचा त्याचा दावा आहे. म्हणून त्याने भररस्त्यात सिद्धु मुसेवाला याची हत्या केली होती. सिद्ध मुसेवाला हत्याप्रकरणात त्याची चौकशी सुरू असून त्यातूनच त्याने ही माहिती दिली.

हेही वाचा >> PM Modi BBC Documentary : नरेंद्र मोदींवरील ‘त्या’ डॉक्युमेंट्रीप्रकरणी बीबीसीला दणका, दिल्ली हायकोर्टाकडून समन्स जारी

आणखी काय खुलासे केले?

भरतपुर, फरीदकोट आणि अन्य तुरुंगात असतानाही लॉरेन्स बिश्नोई खंडणी गोळा करत होता. या खंडणीच्या पैशांतूनच तो त्याची गँग चालवतो. लॉरेन्स बिश्नोई याची चौकशी सुरू असताना त्याने सिद्ध मुसेवाला याच्या हत्येचाही घटनाक्रम सांगितला. तो कॉलेजमध्ये असल्यापासूनच गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होत असे. तेव्हापासून आतापर्यंत केलेले सर्व गुन्हे त्याने तपास यंत्रणांना सांगितले आहेत. चंदीगडमधील क्लबमालक, अम्बाला येथील मॉलचालक, मद्यविक्री करणारे व्यावसायिक, बुकी यांच्याकडूनही तो खंडणी गोळा करत असे. २०१८ ते २०२२ या काळात त्याने २५ शस्त्रे विकत घेतली. यामध्ये ९ एमएम पिस्तुल, एक एके ४७. या शस्त्रांची किंमत जवळपास २ कोटी एवढी असून सिद्धु मुसेवाला हत्याप्रकरणातही या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangster lawrence bishnois shocking confession top 10 murder targets include salman khan and sidhu moose walas manager sgk
Show comments