अमृतसर मतदार संघातून अरुण जेटलींना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते आज(मंगळवार) पहिल्यांदाच अमृतसरमध्ये दाखल झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अरुण जेटलींसह भाजपची मोठ्या रॅलीचे आयोजन केले. रॅलीमध्ये असलेल्या गॅस फुग्यांचा मोठा स्फोट झाला त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. सुदैवाने जेटली यातून बचावले.
एका छप्पररहित वाहनातून अरुण जेटली, भाजप नेते कमल शर्मा, बिक्रम सिंग आणि नवजोतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांच्यासह रॅली काढण्यात आली. रॅली एका चौकात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी फटाके फोडले. त्यातील एक ठिणगी गॅस फुग्यांना लागली आणि क्षणार्धात गॅसफुग्यांचा स्फोट झाला. या स्फोटातून मोठा आगीचा लोळ बाहेर आला होता. सुदैवाने यातून कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. परंतु, आगीचा लोळ इतका भयानक होती की, काही अंतरावर असलेल्या भाजपनेत्यांच्या वाहनापर्यंत याची धग पोहोचली होती. 

Story img Loader