अदानी समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानींनी मंगळवारी (२६ जुलै) ग्रामीण भागातील आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासासाठी ६० हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली. ते वार्षिक सर्वसाधारण सभेतील भाषणात बोलत होते. यावेळी त्यांनी २०२२ हे वर्ष वैयक्तिक दृष्टीने महत्त्व सांगायचे असल्याचंही सांगितलं. वाढती महागाई, विस्कळीत अन्नधान्य पुरवठा, लोकांचे वाढते विस्थापन, आरोग्य सेवांचा फोलपणा, शिक्षण क्षेत्रात आलेले साचलेपण, चलन बाजारातील अस्थिरता आणि अडखळती रोजगार निर्मिती या प्रश्नांचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.

गौतम अदानी म्हणाले, “मला २०२२ या वर्षाचे माझ्या वैयक्तिक दृष्टीने असलेले महत्त्व सांगायचे आहे. या वर्षी माझे वडील आणि आदर्श शांतीलाल अदानी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि माझ्याही षष्ट्यब्दीपूर्तीचे वर्ष आहे. यानिमित्ताने अदानी कुटुंबाने एकत्रितपणे मुख्यतः ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकास यासाठी ६०,००० कोटी रुपयांची रक्कम स्वयंसेवी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे.”

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?

“या तिन्ही क्षेत्रांचा स्वतंत्र विचार न करता एकत्रितपणे केला पाहिजे. कारण संतुलित आणि भविष्याला सामोरे जाण्याला सिद्ध समाज निर्माण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कोट्यवधी भारतीयांना कायमचे वर आणण्याची आपल्याला संधी आहे. हे आपले आपल्याला तसेच देशासाठीचे दायित्व आहे. मोठ्या प्रकल्प उभारणीचा आमचा अनुभव आणि अदानी न्यासाने हाती घेतलेली विविध कामे यातून मिळालेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ आम्हाला मिळेल आणि समाजाच्या सर्वात गरजू घटकांपर्यंत आमच्या कामाचा फायदा पोचेल,” असं गौतम अदानी यांनी सांगितलं.

“आमच्या उद्योगसमूहाचे एकत्रित बाजारमूल्य यावर्षी २०० अब्ज डॉलर पेक्षाही जास्त होते. आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारातून अब्जावधी डॉलरचे भांडवल उभे शकलो. यातूनच भारत आणि अदानी समूहाबद्दल असलेला विश्वास दिसून येतो. आमचे व्यावसायिक यश आणि प्रगती यांची दखल जगभरात घेतली गेली आहे. अनेक परदेशी सरकारे आता आम्हाला त्यांच्या देशांत उद्योग काढून तेथील पायाभूत सुविधा सुधारण्याचा आग्रह करीत आहेत. यामुळेच २०२२ या वर्षात आम्ही भारताच्या सीमा ओलांडून इतर देशात व्यवसाय करण्याची पायाभरणी केली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

गौतम अदानी पुढे म्हणाले, “आमच्या कंपन्यांच्या वाढत्या बाजार मूल्याच्या मुळाशी आमच्याकडील रोख उपलब्धतेची दमदार वाढ, हा मुद्दा आहे. सर्वोत्तम व्यवहार आणि क्षमतेत सततची वाढ यामुळे आमच्या करपूर्व उत्पन्नात २६ टक्के वाढ झाली आहे. एकूण व्यवसायाचे करपूर्व उत्पन्न ४२,६२३ रुपये एवढे होते. ही वैविध्यपूर्ण व्यवसायवृद्धी आमच्या सर्वच व्यवसायांच्या बाबतीत दिसून आली. आमच्या वीज व्यवसायात २६ टक्के वाढ झाली, वाहतूक व्यवस्थापन व्यवसाय १९ टक्के वाढला, ग्राहकोपयोगी वस्तू व्यवसाय ३४ टक्के वाढला आणि अदानी एंटरप्रायझेस (AEL) हा मूळ व्यवसाय ४५ टक्क्यांनी वाढला. या कंपनीच्या खास व्यवसाय पद्धतीला तोड नाही आणि आम्ही त्या आधारे आणखीही प्रगती करणार आहोत. AEL ची जोमदार प्रगती हा समूहाच्या सततच्या उत्कर्षाचा आणि येत्या दशकातील भरभराटीचा पाया ठरेल.”

“मागे वळून पाहता आम्हाला समाधान वाटते, परंतु आत्ताच आम्ही खरा वेग घेतला आहे. गेल्या दोन दशकांत आम्ही जी प्रगती केली. त्यामुळे आणि पायाभूत सुविधांच्या परिसरात केलेल्या व्यवसाय विकासामुळे आम्ही देशातील सर्वात मोठी एकात्मिक पायाभूत सुविधा कंपनी म्हणून उदयाला आलो आहोत. यातूनच आमची अनेक व्यवसायांचा एकत्रित पाया ( ‘platform of platforms’ ) अशी ख्याती झाली असून त्यामुळे आम्हाला भारतीय ग्राहकांच्या अगदी जवळ जाणे शक्य झाले आहे. येत्या अनेक दशकांत अन्य व्यवसाय (B2B) आणि ग्राहक (B2C) या दोन्हींशी संलग्न राहत प्रगती करण्याची क्षमता असलेली इतर कोणतीही कंपनी माझ्या डोळ्यांसमोर नाही,” असं अदानी यांनी सांगितलं.

“मी एक हट्टी आशावादी आहे. उद्योजक म्हणून कसे विकसित व्हायचे आणि उत्कर्ष साधायचा याचे शिक्षण देणारा भारत हा एक बलशाली देश आहे यावर माझी कायमच श्रद्धा आहे. आजच्या तरुणांमध्ये मला आपले आर्थिक सामर्थ्य पुन्हा मिळवून जगाच्या व्यवहारांत एक महत्वाचा देश म्हणून भारताला स्थान मिळवून देण्याची ऊर्मी स्पष्ट दिसते आहे. मी याआधी ही म्हटले आहे की जगातील सर्वात मोठा मध्यमवर्ग भारतात असेल आणि या स्थितीला काम करण्याच्या आणि सुखी जीवन उपभोगण्याच्या वयाच्या व्यक्ती जास्त संख्येने असल्याची जोड ही ताकद अनेक दशके टिकून राहणारी आहे,” असं अदानींनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले, “लोकसंख्येत तरुण व्यक्तींची संख्या जास्त असण्याचा भारताच्या आर्थिक प्रगतीवर चांगला परिणाम होणार आहे. यातच अधिक प्रशिक्षित, अधिक शिकलेला, अधिक सुदृढ आणि तंत्रज्ञानाचा कुशल वापर करणारा कर्मचारीवर्ग उदयाला येईल आणि आपल्या आकांक्षांची पूर्ती करीत जीवनाची पातळी उंचावेल. हे चित्र येत्या दशकात प्रत्यक्ष मला काहीही शंका नाही.”

हेही वाचा : विश्लेषण: अदानी समूहाला कंत्राट देण्यासाठी मोदींचा दबाव; श्रीलंकेतील अधिकाऱ्याचा आरोप आणि राजीनामा; नेमकं काय घडलंय?

“माझा देशाबद्दलचा आशावाद आजच्याइतका उंच कधीच नव्हता. नव्याने उभे राहण्याच्या जिद्दीतून आशावाद निर्माण होतो. स्वतः वरील विश्वासातून ही जिद्द जन्मते आणि हा विश्वास म्हणजेच आशावाद ठरतो. आमच्या बाबतीत असे म्हणता येईल की, भारतात दिसणारी नवनिर्मितीची जिद्द, देशातल्या लोकांच्या डोळ्यांत दिसणारा आशावाद आणि भारताच्या प्रगतीबद्दल दृढविश्वास ही अदानी समूहाच्या व्यवसायाची प्रेरणा आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

Story img Loader