भारतीय उद्योगपती तथा अब्जाधीश गौतम अदानी यांनी फोर्ब्सकडून जारी करण्यात येणाऱ्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुन्हा एकदा तिसरे स्थान पटकावले आहे. त्यांनी अॅमोझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकले आहे. श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थानावर एलॉन मस्क कायम आहेत.
हेही वाचा >>> Video : हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचे व्हिडीओ शुटिंग केल्याने विराट संतापला; ‘खासगी आयुष्य जपा’ म्हणत व्यक्त केली नाराजी
गौतम अदानी यांची संपत्ती १३१.९ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. याच कारणामुळे ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. लुईस व्हिटॉन आणि बर्नार्ड अरनॉल्ट हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती १५६.५ अब्ज डॉर्लर्स आहे. मागील आठवड्यात अॅमोझॉनवरील विक्री घटल्यामुळे बेझोस यांच्या संपत्तीत घट झाली. त्यामुळे सध्या त्यांची संपत्ती १२६.९ अब्ज डॉर्लर्सवर पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठेत मोठे चढउतार होत असल्यामुळे या अब्जाधीशांची संपत्तीही कमी-अधिक होत आहे. याच कारणामुळे श्रीमंतांच्या यादीत अदानी यांनी बेझोस यांना मागे टाकले आहे.
हेही वाचा >>> Act of Fraud: नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ व्हायरल; बंगालमधला पूल पडल्यानंतर म्हणाले होते…
मागील काही दिवसांपासून गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानापर्यंत घसरले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी या यादीत दुसरा क्रमांक गाठला होता. पहि्ल्या क्रमांकावर टेस्ला कारचे सीईओ तथा अब्जाधीश एॅलोन मस्क हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती २२३.८ अब्ज डॉलर आहे.