Gay Couple Gets 100 Years Jail In USA: जॉर्जियातील एक समलिंगी जोडप्याला दत्तक मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर १०० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यायालयाने ही शिक्षा सुनावताना आरोपींना शिक्षेच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा पॅरोल मिळणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. विल्यम आणि झॅचरी झुलोक अशी दोषींची नावे आहेत. या प्रकरणातील दोषी विल्यम ३४ वर्षांचा आहे, तर झॅचरी ३६ वर्षांचा आहे. त्यांनी दोन भावांना दत्तक घेतले होते. पीडित मुलांपैकी एकजण १० तर दुसरा १२ वर्षांचा आहे. दोषी पीडित मुलांसह अटलांटा परिसरात राहत होते.

या दोषींनी सोशल मीडियाचा वापर करून दत्तक मुलांना किमान दोन इतरांबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड केल्याच्या घटनेची चौकशी करताना, पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली होती.

bhopal crime news
Bhopal Crime: वृद्ध आजारी आईला घरात बंद करून मुलगा फिरायला गेला, महिलेचा तहान-भुकेनं दुर्दैवी मृत्यू!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Sunil Yadav assassination
Lawrence Bishnoi Gang : अमेरिकेत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सुनील यादवची हत्या; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी
Ladki Bahin Yojana
Maharashtra News Updates : लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…
Vinod Kambli Diagnosed with Clots in Brain| Vinod Kambli Health Update
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळींच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी, मोफत उपचार करण्याचा रुग्णालयाचा निर्णय
Suresh Dhas News
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरण; सुरेश धस म्हणाले, “बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर सुरु आहे, आका…”
solapur farmer murder
Solapur Crime News : सोन्याच्या हव्यासापायी सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून; मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले

दोषी झॅचरी हा बँकिंग क्षेत्रात काम करतो, तर दुसरा दोषी विल्यम सरकारी कर्मचारी आहे. हे दोन्ही दोषी दत्तक भावंडांना नियमितपणे त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडायचे. इतकेच नव्हे तर ते याचे चित्रिकरणही करायचे. तसेच ते त्यांच्या मित्रांनाही याबाबत सांगायचे. पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांवरून हा दावा खरा असल्याचे सिद्धही झाले आहे. या प्रकरणात आरोपींना २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. याबाबत द न्यूयॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे.

हे ही वाचा : अमेरिकेत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर सुनील यादवची हत्या; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी

कसे समोर आले प्रकरण?

वॉल्टन पोलिसांना २०२२ मध्ये गुगलवर चाइल्ड पोर्नोग्राफी अपलोड केल्याबद्दल तक्रार आली होती. तपासादरम्यान, त्यांनी या प्रकरणी हंटर लॉलेस या आरोपीला पकडले होते. त्यावेळी आरोपीने हा कन्टेन्ट दोषी झॅचरी झुलॉककडून मिळाल्याचे कबूल केले होते. या प्रकरणाची आणखी चौकशी केल्यानंतर पोलिसांना झॅचरी झुलॉक आणि विल्यम डेल झुलॉक या जोडप्याविरुद्ध पुरावे सापडले. त्यावेळी पोलिसांना समलिंगी जोडपे त्यांच्या दत्तक मुलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे आढळले होते.

हंटर लॉलेस असाही दावा केला होता की, झॅचरीने त्याला स्नॅपचॅटवर आपल्या मुलावर बलात्कार करणार असल्याचे सांगणारे अनेक मेसेजेसही पाठवले होते. त्याचबरोबर त्याने एका मुलावर अत्याचार करतानाचा व्हिडिओही पाठवला होता.

याप्रकरणी अमेरिकेच्या स्थानिक न्यायालयाने दोषी जोडप्याला मुलांचे लैंगिक शोषण केल्याबद्दल विविध कलमांखाली १०० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Story img Loader