* हमासकडून दोन ओलिसांची सुटका

गाझा, जेरुसलेम : हमासबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या १८व्या दिवशी इस्रायलने सोमवारी केलेल्या हवाई हल्ल्यांत ७०० पेक्षा जास्त लोक ठार झाल्याची माहिती पॅलेस्टिनींनी मंगळवारी दिली. आतापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईनदरम्यान झालेल्या अनेक युद्धांमध्ये इतक्या मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली नव्हती.

त्याचवेळी, सततचा बॉम्बर्षांव आणि वीजेच्या अभावामुळे अनेक रुग्णालये बंद करावी लागली अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिली.

Hamas-Israel armistice in Gaza after 15 months of intense war
हमास-इस्रायल दरम्यान गाझात युद्धविराम… पश्चिम आशियात आता तरी शांतता नांदेल?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
israel hamas agree to ceasefire conflict in gaza to end after 15 months
इस्रायल-हमास युद्धविरामास सहमती; १५ महिन्यांनंतर गाझामधील संघर्ष थांबणार
Naga Sadhus Enchant Devotees At Triveni Sangam on Makar Sankranti
संक्रातीच्या मुहूर्तावर ‘अमृत स्नान’; नागा साधूंना पहिला मान; त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापूर
Israel Hamas War reuters
इस्रायल-हमासमधील युद्ध आज थांबणार? कतारचे मध्यस्थीचे प्रयत्न; युद्धबंदीसाठी प्रस्ताव
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Nashik Rural Local Crime Branch arrested burglary and loot gang
हरसूल, त्र्यंबकेश्वर भागात घरफोडी करणारी टोळी ताब्यात

दुसरीकडे, हमासने ८५ वर्षीय योशेव्हेड लिफशिट्झ आणि ७९ वर्षीय नुरित कूपर या दोन ओलिसांची सुटका केली. त्यामुळे अन्य ओलिसांच्या सुटकेची आशा वाढली आहे. त्याचवेळी इस्रायलने गाझा पट्टीवरील हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली. या हल्ल्यांमध्ये हमासचा नायनाट होईल असा दावा इस्रायलने केला आहे.

हेही वाचा >>> “शांततेत जगायचं असेल तर…”, इस्रायल लष्कराने गाझा पट्टीतील नागरिकांना दिला पर्याय; सुरक्षा पुरवण्याचेही आश्वासन!

इस्रायलने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सैन्याने सोमवारी गाझा पट्टीवर ४०० हवाई हल्ले केले, त्यामध्ये हमासचे कमांडर मारले गेले तसेच दहशतवाद्यांच्या तळाचे नुकसान झाले. तर त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे सोमवारी ३२० हवाई हल्ले करण्यात आले होते. पॅलेस्टाईनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी बरेच हवाई हल्ले निवासी इमारतींवर करण्यात आले. त्यामध्ये इस्रायलने ‘नागरिकांसाठी आश्रय घेण्यासाठी सुरक्षित’ घोषित केलेल्या दक्षिण गाझामधील इमारतींचाही समावेश आहे.

दरम्यान, या युद्धामुळे पश्चिम आशियात संघर्षांची ठिणगी पडेल, विशेषत: अमेरिकी सैन्याला त्याचा फटका बसेल अशी भीती अमेरिकेला वाटत आहे. त्याचवेळी इस्रायलला युद्धाच्या नियोजनात मदत करण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्करी सल्लागारांना पाठवले.

हेही वाचा >>> ओलिसांच्या सुटकेसाठी हमासने केलेली मागणी मान्य, पण इस्रायलने ठेवली ‘ही’ अट, इजिप्तमार्गे वाटाघाटी सुरू

युद्धाचा सर्वाधिक फटका गाझा पट्टीमधील २३ लाख पॅलेस्टिनींना बसत असून इस्रायलच्या वेढय़ामुळे त्यांना वाढत्या प्रमाणात अन्न-पाणी आणि औषधांच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. इजिप्तमधून गाझासाठी मदत सामग्री येण्यास सुरुवात झाली असली तरी गरजेच्या तुलनेत ती फारच कमी आहे. तसेच, ट्रकसाठी इंधन मिळाले नाही तर मदत सामग्रीचे वितरण थांबवावे लागेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. इतकेच नाही तर अन्न शिजवण्यासाठीही पुरेसे इंधन नसल्याचे पॅलेस्टिनींसाठी संयुक्त राष्ट्रांची मदत संस्था ‘यूएनआरडब्लूए’ने लक्षात आणून दिले आहे.

मॅक्राँ इस्रायल दौऱ्यावर

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ मंगळवारी इस्रायलला गेले. तिथे त्यांनी हमासच्या हल्ल्यात मरण पावलेल्या अथवा ओलीस धरलेल्या फ्रेंच नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हरझोग यांची भेट घेतली. ‘या युद्धामध्ये फ्रान्स इस्रायलच्या बरोबर आहे. मी येथे तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो आहे. दहशतवाद हा फ्रान्स आणि इस्रायल या दोन्ही देशांचा समान शत्रू आहे’, असे त्यांनी हरझोग यांना सांगितले.

निवासी इमारतींवर हल्ले

दक्षिण गाझामधील राफा शहरात इस्रायलने सोमवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यात किमान २८ जणांचा मृत्यू झाला. तर खान युनिस येथे इस्रायलने मंगळवारी सकाळी निर्वासितांच्या इमारतील लक्ष्य केले. त्यामध्ये किमान ३२ जणांचा मृत्यू झाल्याचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. खान युनिस येथे अल-अमल रुग्णालयाजवळ एका घरावर हल्ला झाला. त्यामुळे रुग्णालय आणि त्याच्या आश्रय केंद्रामध्ये घबराट पसरली. या आश्रय केंद्रात ४,००० निर्वासित राहतात.

हमास उद्ध्वस्त होईल

तेल अविव : गाझा पट्टीवर सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे अनेक दहशतवादी मारले गेले, हमास या युद्धात उद्ध्वस्त असा दावा इस्रायलने केला. वेढा घातलेल्या गाझावरील हवाई हल्ले कमी करणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

काठीने मारहाण आणि पायपीट

तेल अविव : हमासने सुटका केलेल्या योशेव्हेड लिफशिट्झ या ८५ वर्षीय ओलीस महिलेने आपले अनुभव कथन केले. हमासने ओलीस धरल्यानंतर काय झाले याची माहिती प्रथमच लिफशिट्झ यांच्या माध्यमातून बाहेर येत आहे. लिफशिट्झ यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘अपहरण केल्यानंतर हमासने मला काठीने मारहाण केली. त्यामुळे माझ्या बरगडय़ांना जखमा झाल्या आणि मला श्वास घेणे कठीण झाले. त्यानंतर ते मला गाझामध्ये घेऊन गेले. यादरम्यान त्यांनी मला ओल्या जमिनीवरून कित्येक किलोमीटर अतंर चालण्यास भाग पाडले. आमच्यावर पहारा करणाऱ्यांनी ‘आम्ही कुराणवर श्रद्धा ठेवणारे लोक आहोत आणि तुम्हाला इजा करणार नाही’ असे सांगितले. त्यानंतर ते माझ्यासह चार जणांना वेगळय़ा खोलीत घेऊन गेले. तिथे आम्हाला चांगली वागणूक देण्यात आली. तिथे स्वच्छता होती आणि आम्हाला औषधांसह इतर वैद्यकीय उपचार देण्यात आले. आम्हाला दिवसातून एकदा काकडी आणि चीझ असे अन्न खायला दिले जात होते’. लिफशिट्झ यांचा पती अजूनही हमासच्या ताब्यात आहे.

इस्रायल सैन्यावर टीका

आपला अनुभव कथन करताना लिफशिट्झ यांनी हमासच्या धमक्या गांभीर्याने न घेतल्याबद्दल इस्रायलच्या सैन्यावर (आयडीएफ) टीका केली. इस्रायलची सीमा अतिशय आधुनिक असली तरी त्याचा काहीही उपयोग झाला नाही असे त्या म्हणाल्या. आयडीएफ आणि शिन बेट यांच्यामध्ये जागरूकतेच्या अभावामुळे आम्हाला फार त्रास झाला. हमासने तीन आठवडय़ांपूर्वी इशारा दिला होता. त्यांनी शेते जाळली होती, त्यांनी फायर बलून सोडले होते आणि आयडीएफने ही बाब गंभीरपणे घेतली नाही अशी टीका लिफशिट्झ यांनी केली.

युद्धामुळे जग अधिक धोकादायक

या युद्धामुळे जग अधिक धोकादायक झाले आहे अशी प्रतिक्रिया जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांना मंगळवारी व्यक्त केली. इस्रायल-हमास युद्धामुळे कामकाज पूर्वीसारखे राहिलेले नाही असे ते म्हणाले. ते सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे भविष्यातील गुंतवणुकीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या एक परिषदेच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते.

Story img Loader