गाझामध्ये गेले २४ दिवस सुरू असलेल्या हल्ल्याची व्याप्ती अधिक तीव्र करण्याच्या हेतूने इस्रायलने आपले आणखी १६ हजार राखीव सैन्य आघाडीवर उतरविले असून शस्त्रसंधीची पर्वा न करता, हमासच्या आधिपत्याखालील बोगद्यांचे जाळे नष्ट करण्याची योजना आखण्यात आली आहे. आतापर्यंतच्या हिंसाचारात १,३७४ पॅलेस्टिनी ठार झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांचा समावेश आहे.
हमास संघटनेने आमच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा हेतू समोर ठेवून बोगदे बांधले आहेत आणि म्हणूनच त्यांचे सर्व बोगदे नष्ट करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे आणि इस्रायल सुरक्षा दलाचे सर्व सध्या त्याच कामी गुंतले आहेत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी सांगितले. आतापर्यंत डझनभर बोगदे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत आणि शस्त्रसंधीची पर्वा न करता उर्वरित बोगदे नष्ट करण्याचे कामही लवकरच पार पडेल, असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले. इस्रायलच्या सैन्याने शेकडो दहशतवाद्यांना ठारही मारले असल्याचे ते म्हणाले. इस्रायलने संयम पाळण्याचे जागतिक स्तरावर आवाहन करण्यात येऊनही गेल्या आठ जुलै रोजी सुरू करण्यात आलेली मोहीम यापुढेही तशीच सुरू ठेवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा