यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे भाकित खरे ठरल्यास भारताचा विकास दर ७.५ टक्क्यांचा पल्याड जाईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केला. जेटली सध्या अमेरिका दौऱ्यावर असून ते बुधवारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यंदा आबादानी.. 
यावेळी जेटली यांनी म्हटले की, २०१५-१६ या आर्थिक वर्षात खालावलेली निर्यात आणि गेली दोन वर्षे झालेल्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेने ७.५ टक्के इतका विकासदर नोंदविला होता.मात्र, जर यंदा हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरला तर आपल्या विकासदरात निश्चितच सुधारणा होऊ शकते. भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या क्षमतेनुसार ७.५ टक्के इतका विकास दर पुरेसा नाही. त्यामुळे यामध्ये निश्चितच सुधारणा होऊ शकते, असे जेटलींनी सांगितले. केंद्रीय वेधशाळेने काही दिवसांपूर्वी भारतात यंदा १०६ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. या पार्श्वभूमीवर भांडवली बाजारात तेजी पाहायला मिळाली होती.
पाऊस-पाण्याच्या सकारात्मकतेने ‘सेन्सेक्स’ला बहर! 

Story img Loader