स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ जनतेवर अन्याय असल्याचे सांगत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. “मोदी सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे पण आता संपूर्ण देश या लुटीच्या विरोधात एकत्र येत आहे. GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ आहे”, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, “आम्ही सरकारमधून बाहेर पडलो तेव्हा व आताच्या पेट्रोलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. गॅसच्या दरात ११६ टक्के वाढ झाली आहे तर पेट्रोलचे दर ४२ टक्क्यांनी व डिझेलचे दर ५५ टक्के इतके प्रचंड वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा भाव १०५ रुपये होता. जो आता ७१ रुपये झाला म्हणजे कच्च्या तेलाच्या भावात वास्तवात ३२ टक्के घट झाली आहे. गॅसच्या किमतीत २६ टक्के घट झाली आहे. पण नागरिकांना मिळणाऱ्या गॅसच्या किमतीत मात्र ११६ टक्के वाढ झाली आहे.”

२३ लाख कोटी रुपये गेले कुठे

“आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या व गॅसच्या किमतीमध्ये २०१४ च्या तुलनेत घटच झाली, परंतु प्रत्यक्षात मात्र पेट्रोल. डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ करून मोदी सरकारनं तब्बल २३ लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले आहेत, ते गेले कुठे”, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे.

हेही वाचा – विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; २५ रुपयांनी महागला सिलेंडर

“पंतप्रधान मोदींनी हे मान्य करायला हवं की १९९० च्या प्रमाणेच आताही यंत्रणा अपयशी ठरली असून त्यात बदल करण्याची गरज आहे. आम्हाला ते लक्षात आल्यावर १९९० मध्ये आम्ही ते मान्य केलं व १९९० ते २०१२ या काळात यंत्रणेमध्ये सुधारणा केल्या. मोदींनीही ते मान्य करावं आणि यंत्रणेमध्ये मूलगामी सुधारणा कराव्यात”, असे राहुल गांधी म्हणाले. “जर पंतप्रधानांना व अर्थमंत्र्यांना त्यांचे सल्लागार योग्य मार्ग दाखवत नसतील तर त्यांनी आमच्याकडे यावं. काँग्रेस पक्षाला अशी परिस्थिती हाताळण्याचा अनुभव आहे आणि आमचे सल्लागार योग्य ते मार्गदर्शन करतील”, अशी टिप्पणीही त्यांनी जोडली.

सिलिंडरची किंमत ११६ टक्क्यांनी वाढली

काँग्रेस नेते राहुल गांधी महागाईच्या मुद्द्यावर म्हणाले, “२०१४ मध्ये नरेंद्र मोदी म्हणाले होते की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. २०१४ मध्ये जेव्हा यूपीए सरकार बाहेर पडलं तेव्हा सिलेंडरची किंमत ४१० रुपये होती आणि आज सिलेंडरची किंमत ८८५ रुपयांवर गेली आहे. सिलेंडरच्या किमतीत ११६% टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ पासून पेट्रोलच्या किंमतीत ४२ % आणि डिझेलच्या किमतीत ५५% वाढ झाली आहे.

Story img Loader