स्टॉकहोम : भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा वापर करून ‘मशीन लर्निंग’ क्षेत्राचा पाया रचल्याच्या कार्याची दखल घेत जोन हॉपफील्ड आणि जिओफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या याच संशोधनामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) क्षेत्र विकसित होण्यास चालना मिळाल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे. हिंटन हे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील पितामह म्हणून ओळखले जातात. हॉपफील्ड यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधन केले आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांनी सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा वापर करून कृत्रिम मज्जातंतूंचे जाळे (आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क) तयार केले. यामुळे मोठ्या माहितीसाठ्यातील विशिष्ट नमुने कृत्रिमरीत्या लक्षात ठेवणे यंत्राला शक्य झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जोन हॉपफील्ड आणि जिओफ्री हिंटन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मंगळवारी जाहीर झाला. भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा वापर करून ‘मशीन लर्निंग’ क्षेत्राचा पाया रचल्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या संशोधनामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) क्षेत्र विकसित होण्याला चालना मिळाली आहे.

हेही वाचा : भाजप, अब्दुल्लांना बळ; काँग्रेसला झळ

नोबेल समितीने म्हटले आहे की, भौतिकशास्त्रातील यंदाचे नोबेल अशा दोन तज्ज्ञांना जाहीर होत आहेत, ज्यांनी भौतिकशास्त्रातील संकल्पनांचा वापर करून ‘मशीन लर्निंग’ क्षेत्राचा पाया रचला. त्याला चालना मिळेल, अशा विविध टप्प्यांचा शोध त्यांनी लावला. हिंटन हे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील पितामह म्हणून ओळखले जातात. ते कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिक आहेत. त्यांनी टोरांटो विद्यापीठात संशोधन केले. हॉपफील्ड हे अमेरिकी नागरिक असून, प्रिन्स्टन विद्यापीठात त्यांनी संशोधन केले.

नोबेल समितीच्या सदस्य एलन मून्स यांनी सांगितले, की दोन्ही शास्त्रज्ञांनी सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा वापर करून कृत्रिम मज्जातंतूंचे जाळे (आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क) तयार केले. या नेटवर्कमुळे मोठ्या डेटामधील विशिष्ट नमुने मशीनला कृत्रिमरीत्या लक्षात ठेवणे सोपे झाले. मानवी मेंदूमधील न्यूरॉन्सच्या रचनेवरून त्यांनी प्रेरणा घेतली.

हेही वाचा : “परदेशात जाऊन देशाचा अपमान करणाऱ्यांना…”, हरियाणातील विजयानंतर अमित शाहांचा राहुल गांधीवर हल्लाबोल!

हिंटनकडून ‘एआय’ वापरातील धोक्यांबाबत प्रबोधन

दोन्ही शास्त्रज्ञांचा त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल सन्मान केला गेला असला, तरी मून्स यांनी संशोधनाची नकारात्मक बाबही सांगितली. त्या म्हणाल्या, मशीन लर्निंगचे फायदे मोठे असले, तरी या क्षेत्रामध्ये होणारा झपाट्याने विकास आपल्या भवितव्याबद्दल चिंता उत्पन्न करतो. मानवी समुदायाला या तंत्रज्ञानाचे मोठे फायदे मिळावेत, यासाठी नैतिक आणि सुरक्षित मार्गाने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरच आहे. हिंटन यांनी या क्षेत्रातील नकारात्मक बाब सर्वांना समजावी, यासाठी गूगल कंपनी सोडली आहे. ते आता मुक्तपणे या क्षेत्रातील नकारात्मक बाबी सर्वांना सांगून प्रबोधन करीत आहेत.

पुरस्कार जाहीर झाल्याने मला खूप आश्चर्य वाटले. नोबेल पुरस्कार मिळेल, असे मला कधीही वाटले नव्हते. ‘एआय’ची तुलना औद्याोगिक क्रांतीशीच करता येईल.

जिओफ्री हिंटन, शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रातील यंदाचे नोबेल विजेते