Georgia : जॉर्जियामधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. जॉर्जियाच्या गुडौरी येथील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये तब्बल १२ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. अशा प्रकारे एका रेस्टॉरंटमध्ये १२ जणांचे मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या मृतांमध्ये ११ परदेशी आणि एका जॉर्जियन नागरिकाचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, ज्या रेस्टॉरंटमध्ये हे कर्मचारी झोपायचे त्या खोलीत त्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांवर हिंसेची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचं सांगितलं आहे, तर जॉर्जियाच्या फौजदारी संहितेच्या कलम ११६ अंतर्गत या घटनेला निष्काळजीपणाने झालेल्या जीवितहानीचं प्रकरण मानलं जात आहे. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

हेही वाचा : Mani Shankar Aiyar On Gandhi Family : माझी राजकीय कारकीर्द घडवली ‘गांधीं’नी आणि बिघडवलीही ‘गांधीं’नीच : मणिशंकर अय्यर

दरम्यान, रेस्टॉरंटमध्ये १२ जणांच्या मृत्यूच्या घटनेनंतर प्राथमिक तपासणी करण्यात आली असता मृतदेहावर हिंसेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस आणि फॉरेन्सिकच्या पथकाकडून करण्यात येत आहे. या घटनेतील मृत्यूचं कारण काय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आता पोलिसांकडून या घटनेसंदर्भात काहींची चौकशी सुरु केली असून आतापर्यंत या घटनेतील मृतांची ओळख पटलेली नाही.

रिसॉर्टच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

जॉर्जियामध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये १२ जणांचे मृतदेह आढळून आल्याची घटना घटली. मात्र, या १२ जणांच्या मृत्यूचं कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, प्राथमिक तपासात एका लहान खोलीत जनरेटर वापरल्याने कार्बन मोनोऑक्साइड पसरल्यामुळे श्वसनात अडथळा निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या घटनेत निष्काळजीपणा झाल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, या घटनेचा तपास पूर्ण झाल्यानंतर १२ जणांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकेल. पण या घटनेमुळे रिसॉर्टच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Georgia news dead bodies of 12 people found in indian restaurant in georgia police investigation begins gkt