इंडियन मुजाहिद्दीनचा अटकेमध्ये असलेला दहशतवादी यासिन भटकळ याने पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटा विषयी तपास पथकाजवळ धक्कादायक खुलासा केला. जर्मन बेकरी मध्ये २०१०ला सामायीक रिक्षामधून बॉम्ब ठेवायला जात असताना यासिन याने त्याच्या सहप्रवाशाला त्याच्याकडील पिशवीमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले होते. सहप्रवाशाने फक्त हसून प्रतिसाद दिल्याचे यासिनचे म्हणने आहे.
प्रसिध्द जर्मन बेकरीमध्ये गेल्यावर टेबल खाली बॉम्ब ठेवण्याआधी यासिन याने ‘अॅपल पाय’ आणि कोल्ड कॉफी मागवली होती, असा खुलासा यासिन याने तपासादरम्यान केला. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला होता. इंडियन मुजाहिद्दीनच्या पुण्यामधील स्थानिक दहशतवाद्यांना २००८ मध्ये ‘एटीएस’कडून त्रास देण्यात आल्यामुळे पुण्याला लक्ष्य करण्यात आल्याचे यासिन याने तपासामध्ये कबुल केले.
“त्या वर्षी देशात कुठेच बॉम्बस्फोट झाला नव्हता. रियाझ याने अहमदाबाद बॉम्बस्फोटाच्या आरोपावरून पकडण्यात आलेल्या पुण्यातील आमच्या सहकाऱयांच्या अटकेचा बदला घेण्यास मला सांगितले,” असे यासिन भटकळ म्हणाला.
जानेवारी २०१०च्या शेवटी यासिन पुण्यामध्ये आला होता. घर भाड्याने मिळवण्यासाठी त्याने पुण्यामध्ये एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो का याची चाचपणी केली होती. आठवडाभर शहराची पाहणी करून यासिन याने स्फोट घडवण्यासाठी दोन ठिकाणांना पसंती दिली. पहिले दगडूशेठ गणपती मंदिर “मालेगाव येथील मस्जिदीमधील बॉम्बस्फोटासंदर्भात” व जर्मन बेकरी “आंतरराष्ट्रीय लभ वेधण्यासाठी”. परदेशी लोकांची रहदारी जास्त असते म्हणून पुण्यातील ओशो आश्रमामध्ये देखील स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न होता असे यासिन याने तपासात कबुल केले आहे.
यासिन भटकळ या इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेच्या सहसंस्थापकास मागील महिन्यात भारत-नेपाळ सिमेवर अटक करण्यात आली आहे.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट: सह प्रवाशाला पिशवीत बॉम्ब असल्याचे सांगितले होते! – यासिन भटकळ
इंडियन मुजाहिद्दीनचा अटकेमध्ये असलेला दहशतवादी यासिन भटकळ याने पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटा विषयी तपास पथकाजवळ
First published on: 26-09-2013 at 02:42 IST
TOPICSयासिन भटकळ
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: German bakery blast bhatkal told auto co passenger about a bomb in his bag