भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे UPIची वापर सतत वाढत आहे. जगातील सर्व देशांमध्ये त्याचा वापर केला जात आहे. भारत सरकार देखील UPI ला त्यांची सर्वात मोठी सुविधा मानते. भारताचा UPI वापरण्याला पंसती देणाऱ्यांच्या यादीत आता जर्मनीचाही (Germany) समावेश झाला आहे. G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग (Volker Wissing) यांनी ही भारताची यशोगाथा असल्याचे म्हटले आहे.

जर्मन मंत्र्याने भाजीपाला खरेदी केला

जर्मनीचे केंद्रीय डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग यांनी UPI वापरून पेमेंट सुलभतेचा अनुभव घेतला आणि ते त्याचे चाहते झाले. खरं तर, वोल्कर विसिंग(Volker Wissing) १९ ऑगस्ट रोजी बेंगळुरूमध्ये G20 डिजिटल मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते आणि दुसऱ्या दिवशी रविवारी बंगळुरूच्या रस्त्यावर आले. येथे त्यांनी भाजी मंडईतून भाजी खरेदी केली आणि यूपीआयद्वारे पैसे दिले. जर्मन मंत्र्याचा भाजी खरेदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हे ही वाचा – बर्फाच्या लाद्या कशा तयार केल्या जातात? पाहा फॅक्टरीमधील व्हिडीओ

जर्मन मंत्र्या UPIमुळे झाले प्रभावित

भारतातील जर्मन दूतावासाने X (Twitter) वर ट्विटद्वारे UPI ची लोकप्रियता आणि त्याच्या वापराचे कौतुक केले. दूतावासाच्या ट्विटमध्ये भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांची प्रशंसा करताना, ”UPI ही देशाच्या यशोगाथांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. जर्मनीचे डिजिटल आणि वाहतूक मंत्री, वोल्कर वाईसिंग हे UPI च्या वापराने प्रभावित झाले. ते म्हणाले की,”हे खूप यूजर फ्रेंडली आहे आणि व्यवहार(transactions) किती लवकर पूर्ण झाला याबद्दल मला आश्चर्य वाटले. त्यांनी UPI च्या सुरक्षा वैशिष्ट्यांचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, ते खूप सुरक्षित आहे आणि मला खात्री आहे की,”माझे पैसे सुरक्षित आहेत’.’

हे ही वाचा – मुंबईच्या रिक्षावाल्यांची बंगळुरुच्या रिक्षाचालकांबरोबर केली तुलना; म्हणे, ”UPI पेमेंटसुध्दा घेत नाही”

सोपे, जलद आणि सुरक्षित पेमेंट

यूपीआय (UPI) भारतीय पेमेंट सिस्टममध्ये एक गेम-चेंजरप्रमाणे समोर येते. लोकांसाठी पैसे देणे आणि घेणे अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित करते.. हे एक सुरक्षित आणि विश्वसनीय पेमेंट सिस्टीम देखील आहे, जो ग्राहक वास्तविक वेळेत२४X ७ पेमेंट करण्यास सक्षम आहे. हे वापरकर्त्यांना आपल्या मोबाइल फोनवर त्वरित पैसे भरण्याची परवानगी देते. आपल्या चांगल्या फायद्यासाठी ओळखले जाणारे युनिफाइड पेमेंट इंटरफेस ५०० मिलिनय पेक्षा जास्त लोकांच्या वापरकर्त्यांसह भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट सिस्टमच्या यादीत सर्वात पुढे आहे.

हेही वाचा – ”चोली के पीछे” गाण्यावर दिल्ली मेट्रोत तरुणाने केला डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ

यूपीआय आणखी चांगले करण्याची तयारी

संपूर्ण जगात भारत UPI स्वीकारत आहे. आता पर्यंत, श्रीलंका, फ्रान्स, संयुक्त अरब अमीरात आणि सिंगापुर ने वाढती फिनटेक आणि पेमेंट टेक्नॉलॉजीज वर भारतबरोबर सहयोग केला आहे. येणार्‍या काळात विशेषता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे यूपीआयमध्ये मोठा बदल घडवून आणणार आहे. भारतीय रिझर्व बँक (RBI) च्या लक्ष्य Conversational Payments सुरू करून UPII ट्रांजेक्शनचा अधिक वापर वाढवणे आहे

Story img Loader