Germany Car Attack : जर्मनीमधील मॅनहाइम शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मॅनहाइम शहरातील एका चौकात गर्दी असलेल्या ठिकाणी एक भरधाव कार आली आणि या गर्दीत घुसली. या कारने अनेकांना चिरडण्याचा प्रयत्न केला असून यात एकजण ठार झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅनहेमच्या शहरातील मुख्य चौकात परेडप्लॅट्झमध्ये एका कार चालकाने भरधाव कार चालवल्यामुळे ही घटना घडली. या चौकात नेहमी लोकांची मोठी गर्दी असते. हा वर्दळीचा भाग आहे. मात्र, या ठिकाणाहून एका कार चालकाने वेगाने कार चालवत अनेकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. या संदर्भातील वृत्त जर्मन माध्यमांच्या हवाल्याने एनडीटीव्हीने दिलं आहे.

दरम्यान, मॅनहाइम शहरात ही घटना घडल्यानंतर लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी बचावकार्य सुरु करत घटनेतील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेत पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर या घटनेत आणखी कोणी सामील आहे का? ही घटना कशी घडली? हा संशयित एकटा होता की त्याला अजून कोणी जोडीदार होता? याची चौकशी आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी नागरिकांना जाण्यास मज्जव करण्यात आला आहे. परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत घटनास्थळाच्या परिसरात कोणालाही न जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.