वृत्तसंस्था, बर्लिन

जर्मनीतील कार्टोग्राफीच्या राष्ट्रीय कार्यालयावर २०२१ मध्ये झालेल्या सायबर हल्ल्यासाठी चीन जबाबदार असल्याचे तपासात आढळून आल्याचा दावा बर्लिनमधील अधिकाऱ्यांनी बुधवारी केला. दशकांनंतर पहिल्यांदाच चीनच्या राजदूताला जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने समज दिली आहे.

Supriya Sule and Saif Ali Khan
Attack on Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
Image Of Mark Zuckerberg
Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप, मेटाच्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी
Amit Shah Slams Uddhav Thackeray
Amit Shah : अमित शाह यांची टीका, “सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेने…”
China is aggressive again after Taiwans war drills What are chances of war
तैवानच्या युद्धसरावाने चीन पुन्हा आक्रमक? युद्धाची शक्यता किती?
sick leave policies German companies
‘सिक लिव्ह’ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची ‘खबर’ काढण्यासाठी जर्मनीत कंपन्यांकडून खासगी गुप्तहेरांची नेमणूक

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सेबॅस्टियन फिशर म्हणाले की, कार्टोग्राफी आणि जिओडेसीवरील हल्ल्याच्या सूत्रधारांविषयी जर्मन सरकारला गुप्तचर सेवांकडून विश्वसनीय माहिती मिळाली आहे. या सायबर हल्ल्यांचा सर्वांत कठोर शब्दांत निषेध करतो. चीनला अशा प्रकारच्या कृत्यांपासून परावृत्त आणि प्रतिबंधित करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेत चीनमधील नेमके कोण जबाबदार आहे, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

हेही वाचा >>>Ban alcohol in Goa: गोव्यात दारूबंदी? भाजपाच्या आमदाराची मागणी; म्हणाले, “पर्यटक गोव्यात…”

गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मॅक्सिमिलियन कॅल म्हणाले, की हा सायबर हल्ला थांबवणे शक्य झाले. अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, फिशर म्हणाले की १९८९ मध्ये तियानमेन स्क्वेअरमधील नरसंहारानंतर चीनच्या राजदूताला जर्मन परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले होते. त्यानंतर या सायबर हल्ल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने चीनच्या राजदूतांना बोलावून या घटनेचा निषेध नोंदवला.

Story img Loader