पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी जर्मनीच्या बर्लिनला पोहोचले आहेत. जर्मनीनंतर पंतप्रधान मोदी डेन्मार्क आणि फ्रान्सला रवाना होणार आहेत. बर्लिन विमानतळावर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर पंतप्रधान थेट हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये भारतीय लोक आधीच उपस्थित होते आणि पंतप्रधान मोदींचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
स्वागत समारंभात लहान मुले देखील उपस्थित होती. दरम्यान, पीएम मोदींनी मान्या या चिमुरडीचीही भेट घेतली आणि मान्यानेही पीएम मोदींशी संवाद साधला. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप खुश दिसत होते. खरंतर मान्याने पीएम मोदींचं चित्र बनवल होतं आणि हे चित्र पाहून पंतप्रधान मोदींनी विचारले की तुम्ही काय बनवले आहे? मान्याने उत्तर दिले की तुमचं चित्रं. पण माझंच चित्र का बनवलं? असा प्रश्न पंतप्रधानांनी केला. मान्याने उत्तर दिले कारण तुम्ही माझे आदर्श आहात. यानंतर पीएम मोदींनीही मान्यासोबत फोटो काढला आणि मान्याने काढलेल्या चित्रावर सहीही केली. मान्याने एएनआय या वृत्तसंस्थेशी पंतप्रधानांच्या भेटीबाबत बोलताना सांगितले, “पंतप्रधान मोदींना भेटणे हा एक अद्भुत अनुभव होता. ते माझे आदर्श आहेत. त्याने माझ्या बनवलेल्या पेंटिंगवर सही केली आणि मला शाबास सांगितले.”
एका मुलाने गाणे गाऊन पीएम मोदींचे स्वागत केले आणि त्या लहान मुलाच्या गाण्याने पीएम इतके प्रभावित झाले की त्यांनी स्वतः चुटकी वाजवून गाण्याचा आनंद लुटला.
पंतप्रधान मोदींच्या युरोप दौऱ्यामुळे भारत- यूरोपीयन संघ शिखर परिषदेसाठी आणि मुक्त व्यापार करार चर्चेला चालना मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी फ्रान्सलाही भेट देतील. तसेच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पुन्हा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतील. पंतप्रधान मोदींची यापूर्वी फ्रान्सला भेट देण्याची कोणतीही योजना नव्हती परंतु इमॅन्युएल मॅक्रॉन पुन्हा निवडून आल्यानंतर त्याचे नियोजन करण्यात आले होते.