भारत, ब्रिटन आणि पोर्तुगालमधील प्रवाशांवरील बंदी उठवण्याची घोषणा जर्मनीने केली आहे. देशातील करोनाच्या डेल्टा व्हायरस प्रकारामुळे सर्वाधिक प्रभावित देशांमधील प्रवाशांना बंदी घातली गेली होती. ती हटविण्याची घोषणा मंगळवारी करण्यात आली. डेल्टा प्रकारामुळे भारत आणि ब्रिटनमध्ये बर्याच प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. ब्रिटनमध्येही करोनाची नवीन बाधितांची नोंद सातत्याने केली जात आहे, तर भारतात दररोज सुमारे ४० बाधितांची नोंद केली जात आहे.
जगभरातील वाढत्या डेल्टा करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वेगाने पसरत असलेला संसर्ग थांबविण्यासाठी बर्याच देशांनी परदेशी प्रवासावर निर्बंध घातले आहेत. या क्रमवारीत जर्मनीने १६ देशांवर प्रवासी निर्बंध देखील घातले आहेत जिथे करोना बाधितांची संख्या जास्त आहे.
आणखी वाचा- दुसऱ्या लाटेची मगरमिठी सैल! तीन महिन्यांनंतर करोना रुग्णसंख्येत मोठी घट
रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूट या जर्मनीच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने सोमवारी उशिरा सांगितले की ब्रिटेन, पोर्तुगाल, रशिया, भारत आणि नेपाळ यांना बुधवारी प्रभावीपणे “विषाणूचे प्रकार” असलेल्या देशातील सर्वाधिक धोका असलेल्या श्रेणीतून काढून टाकले जाईल. ते चिंताजनक व्हेरिएंट मधील दुसर्या क्रमांकाच्या श्रेणीमध्ये जातील. यामुळे आता या देशांमधील नागरिकांना जर्मनीचा प्रवास सुकर होईल.
Germany lifts ban on travellers from variant-hit UK, Portugal, India: AFP News Agency quoting health agency
— ANI (@ANI) July 5, 2021
From tomorrow, Germany is removing the entry ban and easing travel rules for five countries where Delta variant is widespread, including India: Walter J Lindner, German Ambassador to India
(file photo) pic.twitter.com/lBS0SPuhsI
— ANI (@ANI) July 6, 2021
सध्या जर्मनीच्या कोविड १९ नियमांनुसार परदेशातील करोना विषाणूची परिस्थिती लक्षात घेता दोन आठवडे क्वारंटान आणि लसीकरण केल्यानंतर देशात प्रवेश दिला जातो. आता भारतासह या देशांतील नागरिकांना करोना नकारात्मक चाचणी आणि १० दिवसाची क्वारंटान राहणाऱ्यावर देशात येण्याची परवानगी दिली जाईल.
विलगीकरणाचा कालावधी ५ दिवसांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. नवीन नियम बुधवारपासून लागू होणार आहेत. दोन्ही डोस घेतल्यानंतर या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश घेण्यास परवानगी देण्यात येणार आहे.