यू-टय़ूब या गुगलच्या व्हिडिओ आदानप्रदान विभागामार्फत सशुल्क संगीत सेवा या वर्षीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. इतर संगीत सेवा देणाऱ्या कंपन्यांना स्पर्धा देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यात व्हिडिओ हा एक वेगळा भाग आहे. न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे की, मोबाईल फोनच्या माध्यमातून यू-टय़ूबची संगीत सेवा आता गुगल उपलब्ध करून देणार आहे. जाहिरातीविना संगीत ऐकण्यासाठी महिन्याला १० अमेरिकी डॉलर त्यासाठी मोजावे लागतील. स्पॉटिफाय व आरडियो, ऱ्हापसोडी अशा सशुल्क संगीत सेवा आधीच उपलब्ध आहेत. त्यांच्याशी आता यू-टय़ूब संगीत विक्रीतही स्पर्धा करणार आहे. मोफत सेवांपेक्षा जास्त स्वामित्व धन यातून रेकॉर्ड कंपन्यांना दिले जाणार आहे. ही सेवा किमतीच्या दृष्टीने गुगलच्या ऑल अ‍ॅक्सेस सशुल्क सेवेवर आधारित असून त्याचे महिना १० डॉलर शुल्क आहे. यू-टय़ूबची ही सशुल्क संगीत सेवा अतिशय लवचिक असून संगीत विक्रीवर फार कमी र्निबध आहेत. प्रीमियम सव्‍‌र्हिस गुगलच्या गुगल ग्लास व इतर उत्पादनांशी जोडता येईल. काही वेळा मोफत व्हिडिओ यू-टय़ूबवर टाकल्या जात असत, पण नंतर कॉपीराइटच्या भीतीने काढून टाकाव्या लागत असत. यू-टय़ूबच्या प्रवक्तयाने सांगितले की, आम्ही यावर काही सांगू शकत नाही. आम्ही नवीन व चांगले पर्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो. भागीदारांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी देत असतो, सध्या तरी आम्ही तशी काही घोषणा केलेली नाही.
यू-टय़ूब जाहिरातींसह असलेली संगीत सेवा मोफत देणार असल्याचे समजते. सशुल्क सेवेत जाहिरातींचा व्यत्यय असणार नाही. काही वेळा कलाकार त्यांच्या एखाद्या म्युझिक व्हिडिओतील एक-दोन ट्रॅक मोफत प्रसारणासाठी देतात, पण आता पूर्ण अल्बमच स्ट्रीम केला जाण्याची म्हणजे यू-टय़ूबवर सशुल्क दाखवला जाण्याची शक्यता आहे. बिलबोर्ड या संगीत प्रकाशनाने दिलेल्या वृत्तानुसार यू-टय़ूबने सशुल्क व मोफत संगीत सेवा देणे म्हणजे यू-टय़ूबच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये काही बदल केले जाण्याचे संकेत आहेत.