UP Murder Case : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाला पोलिसांनी घटस्फोटीत पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून करून तिचा मृतदेह उत्तराखंडमधील जंगलात फेकल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असलेला आरोपी वीरेंद्र शर्मा उर्फ ​​सोनू याने मधु शर्मा या तिच्या घटस्फोटीत पत्नीला पोटगी देणे टाळण्यासाठी हत्या केली.

पीडित महिलेची धाकटी बहीण मंजू शर्मा यांनी २३ जानेवारी रोजी त्यांची बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मंजू यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची बहीण २१ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता घरातून गेली होती. तेव्हापासून तिचा मोबाईल फोनही बंद होता.

“तक्रारीनंतर, मी स्वतः माझ्या बहिणीचा तपास सुरू केले आणि तिला शोधण्याचा प्रयत्न केला. एका शेजाऱ्याने मला सांगितले की, त्याने माझ्या बहिणीला एका पांढऱ्या कारमध्ये एका पुरूषासोबत बसलेले पाहिले होते. याची आणखी चौकशी केल्यानंतर मला कळाले की कारमधील तो परूष माझ्या बहिणीचा घटस्फोटीत पती होता. काही दिवसांपूर्वी कौटुंबिक न्यायालयाने माझ्या बहिणीला तीन हप्त्यांमध्ये ५,४०,००० रुपये आणि महिन्याला ६ हजार रुपयांची पोटगी मंजूर केली होती”, असे मंजू यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

मंजूने बहीण बेपत्ता होण्यामागे तिचा घटस्फोटीत पती असल्याची शंका पोलिसांकडे व्यक्त केली. त्यानंतर पोलिसांनी त्याल अटक केल्यावर त्याने घटस्फोटीत पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले.

न्यायालयाने मंजूर केली होती पाच लाखांची पोटगी

मधू आणि विरेंद्र यांचा डिसेंबर २००२ मध्ये विवाह झाला होता. तर, २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर मंधूने पोटगीसाठी दावा दाखल केला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये न्यायालयाने, सोनूला त्याच्या पत्नीला तीन टप्प्यांत ५ लाख रुपये आणि देखभाल खर्च म्हणून दरमहा ६,००० रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते.

माफी मागितली अन् काटा काढला

यानंतर पत्नी मधू यांना पोटगी देण्याचे टाळण्यासाठी सतत फोन करू लागला. त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे, असे तो पत्नीला म्हणून लागला. त्याने पत्नीकडे पुन्हा एकत्र राहण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पतीच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन मधू यांनी एकत्र राहण्याचे मान्य केले. यानंतर, विरेंद्रने हरिद्वारच्या चंडी मंदिरात जाऊन माफी मागायची आहे, असे म्हणून पत्नीला त्याने २१ जानेवारी रोजी हरिद्वारला नेले. दोघांनी तिथे चंडी देवीचे दर्शन घेतले. सोनूने माफी मागण्याचे नाटक केले. परत येताना, एक निर्जन जागा पाहून त्याने मधुचा तिच्या स्कार्फने गळा दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह एका खड्ड्यात टाकून त्यावर दगडे टाकली होती.

Story img Loader