गाझियाबादमध्ये एका लग्न समारंभात जेवण वाढणाऱ्या वाढपीची हत्या करण्यात आली आहे. खरकट्या प्लेट्सचा पाहुण्यांना स्पर्श झाल्याने ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. न्युज १८ ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
डीएलएफ शंकर विहार येथील रहिवासी असलेला पंकज कुमार हा वाढपी गाझियाबादमधील सीजीएस वाटिका गेस्ट हाऊसमध्ये १७ नोव्हेंबर रोजी एका लग्न समारंभात काम करत होता. यावेळी काही प्लेट्स तो धुण्यासाठी घेऊन जात होता. त्यावेळी चकून त्याच्या हातातील प्लेट्सचा स्पर्श काही पाहुण्यांना झाला. यामुळे पाहुण्यांनी पंकजबरोबर बाचाबाची केली. या बाचाबाचीचं रुपांतर वादात झालं. त्यांच्यात मारहाण होऊन पंकज जमिनीवर कोसळला. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली.
हेही वाचा >> डॉक्टर तरुणीची आत्महत्या, हुंडा म्हणून BMW कार, १५ एकर जमीन देता न आल्याने लग्न रद्द; नैराश्यातून उचललं पाऊल
गंभीर दुखापत झालेल्या पंकजला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याला एका जंगलात फेकण्यात आलं. त्याचा मृत्यू झाला असवा या कारणाने त्याला जंगलात फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी आपला मुलगा घरी न परतल्याने त्याच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. तसंच, गेस्ट हाऊसमधील प्रत्येकाची चौकशी केली. त्याचा मृतदेह १८ नोव्हेंबरला गढी कट्टैया गावाजवळील झुडपात पोलिसांना सापडला. याप्रकरणी पोलिसांनी मनोज गुप्ता, अमित कुमार आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे.