काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता गुलाम नबी आझाद कोणतं पाऊल उलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. गुलाम नबी आझाद सध्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आयोजित सभेत त्यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आझाद आपल्या नव्या पक्षाच्या माध्यमातून काँग्रेसला टक्कर देणार का हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा- ईडी चौकशीनंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच नरेंद्र मोदींना दिलं जाहीर आव्हान, म्हणाले “मला ५५ तास…”

काश्मीरची जनताच पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवणार

अद्याप नवीन पार्टीचं नाव ठरवलेलं नाही. मात्र, काश्मीरची जनताच पक्षाचं नाव आणि चिन्ह ठरवतील मात्र, माझ्या पक्षाला हिंदुस्तानी नाव देणार. जे सर्व लोकांना समजेल असं नाव ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज पहिल्यांदाच गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यावेळी त्यांची सैनिक कॉलनीत जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा- “भाजपा, आरएसएसने देशाचे विभाजन केले”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, “२०१४ पासून भारतात….”

सभेत काँग्रेसवर जोरदार टीका

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री गुलाम नबी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या समर्थनार्थ रॅली देखील काढण्यात आली होती. सैनिक कॉलनीतील आयोजित सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “मी नवा पक्ष काढणार असल्यामुळे अनेकजण संतप्त झाले आहेत. मात्र, मी कोणाचेही वाईट चिंतत नाही. आम्ही घाम गाळून काँग्रेस बनवली, उभी केली. काँग्रेस ही केवळ कॉम्पुटर आणि ट्वीटरमधून बनलेली नाही. ज्या लोकांचे आम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांची मजल केवळ कॉ्म्पुटर आणि ट्वीटरपर्यंत आहे. ते लोक डिबेटमध्ये खूश आहेत. त्यांना ते लखलाभ असो, आम्हाला वृद्ध लोकं आणि शेतकऱ्यांसोबत रहायचं आहे त्यांना त्यांची बादशाही मुबारक” असं आझाद म्हणाले.

Story img Loader