भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून पक्षाला अडचणीत आणले आहे. सर्व दहशतवादी हे एकाच समाजातील असतात, अशा आशयाचे वक्तव्य गिरिराज सिंह यांनी केल्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. याआधीही त्यांनी मोदींना विरोध करणाऱयांनी पाकिस्तानात जावे, असे म्हटले होते. त्यामुळे निवडणुकीच्या काळात वाद निर्माण झाला होता.
पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, दहशतवाद हा देशाशी संबंधित विषय आहे. मग अशावेळी दहशतवादी कारवायांमध्ये अटक करण्यात आलेले सर्वजण एकाच समाजातील असताना निधर्मी नेते या सर्वाबाबत शांत कसे बसतात. त्या समाजातील सर्वच लोक दहशतवादी आहेत, असे मी मुळीच म्हणणार नाही. मात्र, आत्तापर्यंत जे कोणी पकडण्यात आले आहेत. ते सर्वजण त्याच्या समाजातील आहे, हे तर उघडपणे दिसते आहे. असे गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.
सर्व दहशतवादी एकाच समाजातील – गिरिराज सिंहांचे पुन्हा वादग्रस्त विधान
भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून पक्षाला अडचणीत आणले आहे.
First published on: 14-05-2014 at 11:30 IST
TOPICSगिरीराज सिंहGiriraj Singhलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giriraj courts controversy again