सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची कानउघडणी केल्यानंतर गिरीराज सिंह यांना अश्रू अनावर झाले. मात्र, गिरीराज सिंग यांनी असा कोणताही प्रकार घडल्याचा पूर्णपणे इन्कार केला. माझी आणि पंतप्रधानांची भेट झालीच नाही आणि मी रडलो असे तुम्हाला कोणी सांगितले, तिथे कोणी बघायला होते का, असा सवालही त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला. परंतु, गिरीराज सिंह जेव्हा मोदी यांच्या कार्यालयातून बाहेर आले तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते, असे काही प्रसारमाध्यमांचे म्हणणे आहे.
नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच पक्षाच्या सर्व खासदारांना विरोधकांविषयी वादग्रस्त विधान करून अकारण कोणताही वाद न ओढवून न घेण्याची तंबीही दिली होती.
सोनिया गांधी यांच्याविरुद्धच
सोनिया गांधी नायजेरियन वंशाच्या असत्या आणि त्यांचा वर्ण गोरा नसता, तर काँग्रेसने त्यांना स्विकारले असते का, असे वादग्रस्त विधान सिंग यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर विरोधकांकडून सिंह आणि संपूर्ण भाजप पक्षावर टीकेचा मारा झाला होता. त्यानंतर सिंग यांनी याबद्दल तत्काळ माफी मागून माझा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसल्याचे स्पष्ट केले होते. गिरीराज सिंह यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये नायजेरिया या देशाचा उल्लेख केल्यामुळे त्या देशानेसुद्धा भारत सरकारकडे माफी मागण्याची मागणी केली होती.
नरेंद्र मोदींनी कानउघडणी केल्यानंतर गिरीराज सिंहांना अश्रू अनावर…
सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांची कानउघडणी केल्यानंतर गिरीराज सिंह यांना अश्रू अनावर झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-04-2015 at 02:17 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giriraj singh breaks down after narendra modi pulls him up for his remarks against sonia gandhi