आणंद : काँग्रेस नेते राहुल गांधी हे ‘विदूषक’ असल्याचे संपूर्ण जगाला माहीत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेणे त्यांच्या क्षमतेपलीकडचे आहे अशी तिखट टीका केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राजमंत्री गिरीराज सिंह यांनी गुरुवारी केली. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना, ‘पंतप्रधान मोदींना असे वाटते की आपल्याला देवापेक्षाही जास्त कळते’ अशी टीका केली होती. त्याला गिरीराज सिंह यांनी प्रत्युत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपण काय बोलत आहोत हे खुद्द राहुल यांनाही कळत नाही असे ते म्हणाले. त्यांच्या आजी (इंदिरा गांधी)संसदेमध्ये म्हणाल्या होत्या की भारताचे पंतप्रधान परदेश भूमीवर संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतात. दुसऱ्या बाजूला त्यांचे नातू भारतावर टीका करत आहेत असा आरोप सिंह यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giriraj singh criticizes rahul gandhi as a clown amy