राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सोमवारी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि बिहार टॉपर्स घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि दोघांमध्ये किती जवळीक आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लालूप्रसाद यांच्या ट्विटर खात्यावर हे छायाचित्र टाकण्यात आले असून भाजपने सत्य जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. भाजपला याबाबत काय म्हणावयाचे आहे, गिरिराज सिंह यांच्या निवासस्थानामधून कोटय़वधी रुपये हस्तगत करण्यात आले होते, ते पैसै कोणाचे होते, असे सवाल लालूप्रसाद यादव यांनी उपस्थित केले आहेत.

गिरिराज सिंह यांच्याशी बच्चा राय यांचे जवळचे संबंध आहेत आणि गिरिराज सिंह हे नियमितपणे राय यांच्या महाविद्यालयात बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी हजेरी लावतात, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

गिरिराज सिंह यांच्या प्रोत्साहनामुळे सर्व गैरप्रकार सुरू आहेत, राय यांच्यासमवेत गिरिराज सिंह यांना वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावयाचे आहे, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Giriraj singh may hand in bihar exam scam