या वेळच्या अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेत कालचा सोमवार खूप महत्त्वाचा. इथे अमेरिकेतच नव्हे, तर साऱ्या जगभरात कोटय़वधी उत्सुक टीव्ही संचाला, इंटरनेट प्रक्षेपणासाठी संगणकाला नाक लावून बसले होते. निमित्त होतं ते एका सोहळ्याचं. जे नशीबवान आणि श्रीमंत होते त्यांनी याचि देही याचि डोळा हा सोहळा अनुभवण्यासाठी न्यूयॉर्कच्या हेंपस्टेड इथल्या विद्यापीठाच्या आवारात या सोहळ्याची तिकिटं काढून ठेवली होती. एखादा जलसा वा खेळाचा सामना असावा त्याप्रमाणे हॉटेलांत, क्लबांत समूहाने हा थेट प्रक्षेपित प्रसंग पाहण्याची सोय केली होती. युरोपात अनेकांनी तो पाहता यावा यासाठी पहाटे तीनचे गजर लावले होते. जगभरातील सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या, माहितीजालातील संकेतस्थळं, वर्तमानपत्रं, वृत्तसेवा या सगळ्यांवर एकच विषय होता.. आणि हे होत होतं त्या वेळी आपल्याकडे मंगळवार पहाटलेला होता.

अध्यक्षीय निवडणुकीतले दोन प्रमुख उमेदवार- रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक हिलरी क्लिंटन या दिवशी पहिल्यांदा एकमेकांसमोर आले. पहिल्या अध्यक्षीय चर्चेसाठी. एनबीसी वृत्तवाहिनीचा निवेदक लेस्टर होल्ट हा या पहिल्या चर्चेचा सूत्रसंचालक. ही चर्चा ९० मिनिटांची. प्रत्येकी पंधरा पंधरा मिनिटांचे सहा कप्पे. त्यांची रचना विषयवार. प्रत्येकाची सुरुवात लेस्टरच्या एका प्रश्नानं आणि त्यावर दोन्ही अध्यक्षीय उमेदवारांनी मांडलेली मतं, अशी रचना. ही चर्चा बहारदार होईल, यावर सगळ्यांचं आधीपासूनच एकमत होतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काहीही, मनाला येईल ते बरळण्याची ट्रम्प यांची क्षमता. ट्रम्प यांच्या जिभेला हाड अािण अविवेकाला धरबंध नाही. ते काहीही बोलू शकतात. ‘हातच काय, माझे सगळेच अवयव सुंदर आहेत आणि अनेक महिलांना ते माहिती आहे’ इथपासून ते ‘अमेरिका अािण मेक्सिको यांच्यात सीमेवर भिंत बांधली जावी, तिचा खर्च मेक्सिको करेल’ किंवा ‘ओबामा यांच्यापेक्षा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हेच जास्त धाडसी आहेत’ ..अशा धक्कादायक, अविवेकी विधानांपर्यंत ट्रम्प काहीही बोलू शकतात.

Kamala Harris, presidential debate,
विश्लेषण : अध्यक्षीय डिबेटमध्ये कमला हॅरिस यांची बाजी? ट्रम्प यांची कोणत्या मुद्द्यांवर कोंडी? निवडणुकीवर परिणाम किती?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Donald Trump vs Kamala Harris Presidential Debate 2024
Donald Trump vs Kamala Harris Debate: कमला हॅरिस यांचा आत्मविश्वास दिसला; ट्रम्प यांनी वरचढ होण्याची संधी गमावली, वाद-विवादात काय काय झाले?
Prime Minister Narendra Modi tries his hands on a dhol.
Narendra Modi : सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींचं ढोलवादन! व्हिडीओ चर्चेत
RSS, BJP, Mohan Bhagwat
भाजपला धोरणबदलाचा अप्रत्यक्ष सल्ला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका
kamala harris usa president marathi news
विश्लेषण: कमला हॅरिस यांच्यासमोर इतिहासाचे आव्हान? १८३६ नंतर एकदाच जिंकली होती विद्यमान उपाध्यक्षाने अध्यक्षीय निवडणूक…
Rashid Latif on jay shah and team india
“टीम इंडिया पाकिस्तानमध्ये येणार”, जय शाह ICC चे अध्यक्ष झाल्यावर रशीद लतीफचा मोठा दावा; म्हणाला, “५० टक्के…”
Jay Shah Becomes New ICC Chairman and Elected Unopposed
Jay Shah ICC Chairman: जय शाह यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड, जागतिक क्रिकेटमध्ये आता भारताचा दबदबा

या चर्चेचं आयोजन मोठय़ा चतुरपणे करण्यात आलं. लेस्टर होल्ट हा आफ्रिकी अमेरिकन आहे. म्हणजे अमेरिकेला जवळ करणाऱ्या अनेक निर्वासित कुटुंबांतील एक आणि ट्रम्प यांची निर्वासितांबाबतची मतं तर धक्कादायक आहेत. त्या सगळ्यांना आणि विशेषत: ते मुसलमान असतील तर सर्वानाच, अमेरिकेतनं बाहेर काढायला हवं, असं ट्रम्प जाहीरपणे म्हणाले. याची त्यांना लाजही नाही. वास्तविक त्यांचं सगळंच आर्थिक साम्राज्य दुबई अािण अन्य इस्लामी देशांत उभं राहिलंय. तिकडे गेले की ‘आय लव्ह मुस्लिम्स’ असं ते म्हणतात आणि आता अध्यक्षीय निवडणुकीत अशी कर्कश भूमिका त्यांनी घेतलीय. बरं, परत खोटं बोल पण रेटून बोल, असा त्यांचा लौकिक. ‘ओबामा यांचा जन्म मुळी अमेरिकेतला नाहीच’, अशी एक लोणकढी त्यांनी मध्ये मारली होती. ती जेव्हा अंगाशी आली तेव्हा, ‘क्लिंटन यांनीच असं विधान केलं होतं’, अशी मखलाशी ट्रम्प यांनी केली. तेव्हा या अशा वादळी असत्यवचनीला लेस्टर आवरणार कसा, त्यानं त्यासाठी काय करायला हवं, याच्या चर्चा अमेरिकी प्रसारमाध्यमात आधीपासून रंगल्या होत्या. आता त्याला हे जमलं की नाही याचं विश्लेषण सुरू होईल. हा झाला एक भाग.

या अशा चर्चातनं कुंपणावरच्या मतदारांचं मत बनतं, असं मानलं जातं. खरंही असतं ते. या कुंपणावरच्या मतदारांना जिंकणं, आपल्याकडे वळवणं यासाठी प्रत्येक उमेदवार शेवटच्या महिन्यात जंग जंग पछाडतो. हे आपल्याकडेही होतंच. पण इथे अमेरिकेत अधिक होतं. याचं कारण असं की इथली निवडणूक पद्धती आपल्यासारखी नाही. म्हणजे नागरिकांनी मतं द्यायची, जो अधिक मतं मिळवेल तो जिंकला इतका सोपा मामला नाही. विजयी होण्यासाठी ही लोकप्रिय मतं, म्हणजे जनतेतनं दिली जाणारी लागतातच, पण त्याचबरोबर दोन्ही उमेदवारांना देशभरातल्या राज्यांच्या विधानसभांकडनंही मतं मिळावी लागतात. म्हणजे आपल्याकडे कसं राज्यसभेत विजयी होण्यासाठी विधानसभा हाच मतदारसंघ असतो, तसं. अमेरिकेत प्रत्येक राज्याला अशी निर्धारित मतं निश्चित करण्यात आलेली आहेत. त्याला म्हणतात इलेक्टोरल कॉलेज. आपण म्हणू या मतदार मंडल. अमेरिकेत ५० राज्यं आहेत. या ५० राज्यांना निर्धारित करण्यात आलेल्या मतांची बेरीज ही अमेरिकेची केंद्रीय प्रतिनिधी सभा.. म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज अािण सेनेट यांच्या एकूण सदस्यसंख्येइतकी आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेची सदस्यसंख्या आहे ४३५ अािण सेनेटचे १०० अशी ५३५ अधिक दोन मतं राजधानी वॉशिंग्टन डीसीसाठी. म्हणजे झाले ५३७.

याचा अर्थ विजयी होण्यासाठी अध्यक्षीय उमेदवाराला किमान मतांची गरज असते २७० इतकी. ही अत्यावश्यक. ही इतकी मतं मिळाली नाहीत तर व्हाइट हाऊसमध्ये निवासाची संधी नाही. ही संख्या इतकी महत्त्वाची की एक वेळ लोकांकडनं कमी मतं मिळाली तरी चालतील, पण ही मतदार मंडलातली २७० मतं मिळायलाच हवीत. ती मिळण्यात उमेदवार कमी पडला तर त्याचा अल गोर होतो. जॉर्ज बुश यांच्या विरोधात २००० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत वास्तविक अल गोर यांना अधिक जनतेचा पाठिंबा होता. लोकांकडनं गोर यांना देशभरातनं मिळालेली मतं होती ५ कोटी ९ लाख ९९ हजार ८९७, तर बुश यांना पडली ५ कोटी ४ लाख ५६ हजार २ इतकी मतं. गोर यांना पडलेल्या मतांचं प्रमाण होतं ४८.४ टक्के आणि बुश यांचं ४७.९ टक्के. पण तरी अध्यक्षपदाची माळ पडली बुश यांच्या गळ्यात. कारण मतदार मंडलातली २७० मतं बुश यांनी जिंकली, तर गोर यांना २६६ मतांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळे बुश जिंकले अािण अधिक जनतेचा पाठिंबा असूनही गोर हरले. यावरनं या मतदार मंडलाच्या मतांचं महत्त्व लक्षात येईल.

त्यामुळे अध्यक्षीय उमेदवाराला दुहेरी लढावं लागतं. एका बाजूला मतदारांना जिंकायचं अािण दुसरीकडे मतदार मंडलही आपल्या बाजूनं कौल देईल, यासाठी प्रयत्न करायचा. अमेरिकेचा आकार लक्षात घेता हे शारीरिकदृष्टय़ा अशक्य आहे. मग उमेदवार ही लढाई कशी लढतात?

या उमेदवारांचा डोळा असतो राज्यांच्या मतदार मंडल संख्येवर. म्हणजे समजा कॅलिफोर्निया हे राज्य घेतलं, तर त्या राज्याला आहेत ५५ मतं. हे  मतदारसंख्येच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं राज्य. खालोखाल टेक्सास. त्याला आहेत ३८ मतं. हे टेक्सास पारंपरिकदृष्टय़ा रिपब्लिकनांचं राज्य (बुश पितापुत्र इथलेच) म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार त्या राज्यातल्या मतांसाठी फार वेळ घालवत नाही. तसंच ५५ मतांचं तगडं कॅलिफोर्निया हे राज्य डेमोक्रॅटिक मानलं जातं. तिथं रिपब्लिकन उमेदवार डोकेफोड करायला जात नाही. तर अशा पद्धतीनं प्रत्येक राज्याची राजकीय कुंडली मांडलेली असते. ही डेमोक्रॅटिक किंवा रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराची मतदार मंडलातली.. शाश्वत मतं मानली जातात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे डोंबिवलीला जसा राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा उमेदवार मतांसाठी रक्त आटवायला जात नाही, तसंच हे. तो मतदारसंघ भाजपचा किंवा बारामती कसा पवारांचा, तसं. तर ही अशी हक्काची राज्य विधानसभांची मतं मोजली तर रिपब्लिकन उमेदवाराकडे या वेळी मतदार मंडलातली १९१ मतं आहेत तर डेमोक्रॅटिक उमेदवाराकडे २१७ मतांची बेगमी आहे. म्हणजे या क्षणाला हिलरी यांच्याकडे २१७ मतं आहेत तर ट्रम्प यांना १९१ मतांची खात्री आहे. पण त्यांना विजयासाठी हवी आहेत २७० मतं. ती येणार कुठून? तर १० राज्य विधानसभांच्या मिळून १३० मतांतून. ही राज्यं तूर्त तरंगती आहेत. डेमोक्रॅटिक की रिपब्लिकन, असा त्यांचा निर्णय व्हायचाय.

याचा अर्थ ट्रम्प किंवा क्लिंटन यांचा सारा प्रयत्न आहे तो या तरंगत्या राज्यातल्या मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी. याचाच दुसराही अर्थ असा की, ही निवडणूक ५० राज्यांत जरी लढली जात असली तरी खरा अटीतटीचा संघर्ष आहे तो फक्त या १० राज्यांत. ही दहा राज्यं अािण त्यांची मतं आहेत : फ्लोरिडा २९ मतं, पेनसिल्वेनिया २०, ओहायो १८, नॉर्थ कॅरोलायना १५, व्हर्जिनिया १३, विस्कोन्सिन १०, कोलोरॅडो ९, आयोवा अािण नेवाडा प्रत्येकी ६ आणि न्यू हॅम्पशायर ४. ही राज्ये निवडणुकीच्या काळात ओळखली जातात बॅटलग्राऊंड स्टेट.. म्हणजे युद्धभू राज्यं.. नावानं.

पण गंमत म्हणजे म्हणून इतर राज्यांतली एका उमेदवाराकडची मतं दुसऱ्या उमेदवाराकडे जातंच नाहीत, असं नाही. उदाहरणार्थ टेक्सास. हे राज्य पारंपरिक रिपब्लिकन. पण या निवडणुकीत टेक्सन आमदार आपल्या पक्षाच्या ट्रम्प यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाही. हे राज्य जर क्लिंटन यांच्या मागे उभं राहिलं तर तो मोठा बदल मानला जाईल. म्हणून कोणत्याही राज्यावर डोळे झाकून अवलंबून राहावं अशी परिस्थिती नसते.

कारण रिपब्लिकन वा डेमोक्रॅटिक पक्षाचा एखाद्या राज्यातला आमदार देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मत देईल याची हमी नाही. त्यामुळे अध्यक्षीय उमेदवारांना आपापल्या राज्यातल्या आमदारांनाही सांभाळावं लागतं. हे सांभाळणं अर्थातच आपल्याकडच्या ‘मॅनेज’ करणं या अर्थाचं नाही. त्यासाठी पैशाच्या बॅगांची व्यवस्था करावी वगैरे लागते, असं नाही. तर तो अध्यक्षीय उमेदवाराच्या राजकीय विचारधारेस पाठिंबा देण्याचा वा न देण्याचा प्रश्न असतो. आपल्यासारखा पक्षादेश काढायचा अािण अमुकला मतदान करा, असं पक्षाध्यक्षांनी सांगायचं, असा प्रकार इथे नाही. अमेरिकेत पक्षांतर्गतसुद्धा लोकशाही आहे, ती या पद्धतीमुळे.

म्हणून अमेरिका हा लोकशाहीतला मुक्तछंद आहे.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber