कर्नाटकात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आहे. नंतर मुलीला फरपट नेलं आहे. ही थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या व्हिडीओत भटके कुत्रे मुलीवर हल्ला करताना, फरपटत नेताना आणि चावा घेताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोप्पल शहरातील रायरा मठाजवळ ही घटना घडली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, भटक्या कुत्र्यांनी मुलीवर हल्ला केला. नंतर तिला फटपटत नेत सोडून दिलं. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

हेही वाचा : विश्लेषण : कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ का होत आहे? कुत्र्यांच्या आक्रमकतेतील वाढीची कारणं काय?

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केरळमध्ये ११ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. एकटी खेळत असताना कुत्र्यांनी हा हल्ला केला. भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याने कुन्नूरच्या जिल्हा पंचायतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

“भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर बरेच प्रयत्न करण्यात आले. पण, हे प्रयत्न तोकडे पडत असून, कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कुत्र्यांची हत्या करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावे,” असं या याचिकेत म्हटलं आहे.