Girl Cried At Ratan Tata Funeral: दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला लोकांची गर्दी झाली होती. याच गर्दीतील एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही तरुणी हमसून हमसून रडताना दिसत आहे.
रतन टाटा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते आयसीयूमध्ये होते. बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. आज त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांचे अंत्यदर्शन घ्यायला आलेल्या तरुणीला रडू कोसळलं. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वरिंदर चावला नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतील तरुणी खूपच रडताना दिसत आहे. काही जण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात.
रतन टाटा हे प्राणीप्रेमी होती. आज त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या पाळीव श्वानाला आणण्यात आलं होतं. त्यांच्या निधनानंतर त्या पाळीव श्वानाने काहीच खाल्लं प्यायलं नव्हतं, त्या श्वानाचा व्हिडीओ पाहूनही लोक भावुक झाले.
हेही वाचा – कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची रतन टाटांशी भेट अन् मैत्री कशी झाली? वाचा
दरम्यान, रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबईत आले होते. पियुष गोयल यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी, सून श्लोका मेहता, मुलगा आकाश मेहता आले होते. आमिर खान व किरण राव यांनीही रतन टाटा यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.