विवाहापूर्वी साजशृंगारासाठी गेलेल्या एका मुलीवर ब्युटी पार्लर जवळच एका तरुणाने आम्ल (अ‍ॅसिड) फेकले.
ही मुलगी २२ वर्षांची असून बर्नाला येथील रहिवासी आहे  अंदाजे २५ वर्षे वयाच्या मुलाने तिच्या तोंडावर आम्ल फेकले व नंतर तो सारभानगर वसाहतीत असलेल्या ब्युटी पार्लरजवळ असलेल्या एका वाहनावर बसून तो पळून गेला, असे लुधियानाचे पोलिस आयुक्त एन.एस.ढिल्लन यांनी सांगितले. ते म्हणाले, की मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा बर्नाला येथीलच रहिवासी आहे. तो या मुलीला ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा,’ अशा धमक्या देत असे. हा मुलगा या मुलीच्या मैत्रिणीचा भाऊ आहे, त्याला पकडण्यासाठी बर्नाला येथे पोलिस पथके कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा