गेल्या आठवड्यात शनिवारी हमासकडून इस्रायलवर शेकडो रॉकेट्स डागले आणि युद्धाचा भडका उडाला. गाझा पट्टीतून हमासनं हे रॉकेट डागल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली. पाठोपाठ इस्रायलयनंही गाझा पट्टीत रॉकेट हल्ले सुरू केले. दोन्ही बाजूंनी युद्धाचा भडका उडाला असून आज युद्धाचा पाचवा दिवस आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून नागरिकांवर केलेल्या अत्याचारांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. त्यातच एका तरुणीचा अर्धनग्न मृतदेह हमासचे दहशतवादी एका कारमध्ये ठेवून त्याची विटंबना करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, आता ती तरुणी जिवंत असल्याचा खळबळजनक दावा तिच्या आईने केला आहे.

इस्रायलनं आपल्या भूमीवर अतिक्रमण करून तिथे ठिय्या मांडल्याचा दावा कित्येक वर्षांपासून पॅलेस्टाईनकडून केला जात आहे. दोन्ही बाजूंनी चर्चा व संघर्षाच्या अनेक फेऱ्या आत्तापर्यंत झाल्या आहेत. मात्र, त्यातून अद्याप तोडगा निघालेला नाही. आता पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर अमानुष हल्ला चढवला आहे. यामुळे युद्धाला सुरुवात झाली असून इस्रायलही हमासला पूर्णपणे संपवण्यासाठी इरेला पेटला आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचं दिसत आहे.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
punha kartvya aahe
Video: “तुम्ही कितीही दूर…”, वसुंधराने केला सासूचे मन जिंकण्याचा निर्धार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत नवीन वळण, पाहा प्रोमो
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून

काय आहे व्हिडीओमध्ये?

हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये विचलित करणारी दृश्य जगासमोर आली. हमासचे काही दहशतवादी एका तरुणीचा अर्धनग्न मृतदेह कारच्या मागच्या बाजूला ठेवून तिची धिंड काढत असल्याचं दिसून आलं. काही दहशतवाद्यांनी मृतदेहावर पाय ठेवले होते, तर काहींजण मृतदेहावर थुंकत असल्याचंही व्हिडीओत दिसत होतं. आधी ही तरुणी इस्रायली नागरिक असल्याचं बोललं जात होतं. मात्र, नंतर ती मूळची जर्मन युवती असून इस्रायलमध्ये वास्तव्यास असल्याची बाब समोर आली.

हमासच्या क्रौर्याची परिसीमा; तरुणीच्या अर्धनग्न मृतदेहाची काढली धिंड; व्हिडीओमुळे दहशतवाद्यांचे अत्याचार आले जगासमोर!

कोण आहे ही तरुणी?

शॅनी लॉक असं या २२ वर्षीय तरुणीचं नाव आहे. तिच्या शरीरावर काढलेल्या टॅटूंमुळे तिची ओळख पटली. आपल्या मित्र-मैत्रिणींसमवेत शॅनी लॉक गाझा पट्टीपासून काही अंतरावर आयोजित करण्यात आलेल्या सुपरनोव्हा फेस्टिव्हलमध्ये गेली होती. मात्र, त्याचदिवशी हमासच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढवला.

दरम्यान, ही तरुणी जिवंत असल्याचा दावा आता तिच्या आईनं केला आहे. “आमच्याकडे पुरावे आहेत की शॅनी जिवंत आहे. पण तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्या डोक्यावर गंभीर इजा झाली आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. सुरक्षा पथकांनी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे. शॅनी गाझा पट्टीत कुठेतरी आहे. तिला तिथून बाहेर काढायला हवं. या घडीला आपण कुणाची कुठली हद्द आहे याचा विचार करू शकत नाही”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया शॅनीची आई रिकार्डा लॉक यांनी दिली आहे.

Story img Loader