स्वयंघोषित गुरू आसाराम बापू यांनी लैंगिक छळ केलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आज रविवार बापूंच्या अटकेनंतर उपोषण सोडले. मुलीच्या वडिलांनी काल शनिवारपासून आसाराम बापूंना अटक होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.
आसाराम बापू यांना शनिवारी मध्यरात्री इंदूरमधील आश्रमातून अटक करण्यात आली आहे. त्यांना आज जोधपूरला नेण्यात आले. पोलीस अधिकारी राजेश्वर सिंह यांनी मुलीच्या वडिलांना पाणी देऊन त्यांचे उपोषण सोडले. मुलीचे वडिल म्हणाले, “बापूंच्या अटकेनंतर प्रकरणातील पहिली अडचण नष्ट झाली आहे. आता कायदेशीर लढाई लढता येईल. माध्यामांच्या प्रयत्नांमुळे आसारामबापूंना अटक होऊ शकली. मी माध्यमांचे आभार मानतो.” 

Story img Loader