आज मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर देशभर पतंग उडविण्याची धूम सुरू असताना पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱया मांजामुळे गळा चिरला गेल्याने १० वर्षीय लहान मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना जयपूरमध्ये घडली.
पतंग उडविण्यासाठी काच पावडर लावलेला मांजा काहीजण वापरतात परंतु, या मांजामुळे याआधीही अनेकवेळा घातपात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तरीसुद्धा यावर योग्य ते पाऊल अजूनही उचलण्यात आलेले नाही. जयपूरमधील टोंक रोड परिसरात काच पावडर असलेल्या मांजाने गळा चिरला गेल्याने या मुलीला आपला जीव गमवावा लागला.
पोलिसांच्या माहितीनुसार, या चिमुकलीचे नाव चंचल असे असून ती आपल्या घरासमोर खेळत होती. त्यादरम्यान काच पावडरयुक्त मांज्यात तिची मान अडकली गेली. मान कापली गेल्याने जागीच प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. तेथील नागरिकांनी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.
पतंगाच्या मांजाने घेतला १०वर्षीय मुलीचा जीव!
आज मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर देशभर पतंग उडविण्याची धूम सुरू असताना पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱया मांजामुळे गळा चिरला गेल्याने १० वर्षीय लहान मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना जयपूरमध्ये घडली
First published on: 14-01-2014 at 05:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls throat slit by kite thread dies