आज मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर देशभर पतंग उडविण्याची धूम सुरू असताना पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱया मांजामुळे गळा चिरला गेल्याने १० वर्षीय लहान मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना जयपूरमध्ये घडली.
पतंग उडविण्यासाठी काच पावडर लावलेला मांजा काहीजण वापरतात परंतु, या मांजामुळे याआधीही अनेकवेळा घातपात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तरीसुद्धा यावर योग्य ते पाऊल अजूनही उचलण्यात आलेले नाही. जयपूरमधील टोंक रोड परिसरात काच पावडर असलेल्या मांजाने गळा चिरला गेल्याने या मुलीला आपला जीव गमवावा लागला.
पोलिसांच्या माहितीनुसार, या चिमुकलीचे नाव चंचल असे असून ती आपल्या घरासमोर खेळत होती. त्यादरम्यान काच पावडरयुक्त मांज्यात तिची मान अडकली गेली. मान कापली गेल्याने जागीच प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. तेथील नागरिकांनी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा