पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत प्रचंड व्यग्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० पारचा नारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तर पाच टप्पे बाकी आहेत. १ जूनपर्यंत लोकसभा निवडणूक चालणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. अशात माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी एकामागोमाग एक पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले आहेत मार्कंडेय काटजू?

“हे राम! हिंदुस्थानातले लोक कसे आहेत बघा, ज्या ५६ इंची छातीच्या विश्वगुरुंनी त्यांना आकाशापर्यंत नेलं, त्या विश्वगुरुला ४ जूनच्या दिवशी जोड्याने मारुन हाकलणार आहेत. त्राही माम त्राही माम” अशी खोचक पोस्ट मार्कंडेय काटजूंनी केली आहे. इतकंच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट हिमालयात धाडावं असाही सल्ला दिला आहे.

हे पण वाचा- पाच वर्षात पाच पंतप्रधान देण्याची काँग्रेसची नीती देशातील जनता सहन करणार नाही – नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या आणि…

“माझा सल्ला आहे की मोदींना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या पापांचं प्रायश्चित्त करण्यासाठी हिमालयात धाडलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानालाही धक्का लागणार नाही आणि देशाचीही त्यांच्यापासून सुटका होईल. हरि ओम” अशी खोचक टीकाही काटजू यांनी केली आहे. काटजू यांनी केलेल्या पोस्टला अनेक जण रिपोस्ट करतआहेत. तसंच विविध प्रतिक्रियाही देत आहेत. आज सकाळीही त्यांनी एक पोस्ट केली आहे. मोदी तुम्ही १० वर्षे सेवा केलीत आता तरी जीव सोडा की आमचा असं काटजू यांनी म्हटलं आहे.

प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी केलेल्या या पोस्ट चर्चेत आहेत. काटजू हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी आणि पोस्टसाठी ओळखले जातात. अशात त्यांनी मोदींना हिमालयातच धाडण्याचा सल्ला देऊन टाकला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give bharat ratna to narendra modi and send him to atonement in himalayas said markandey katju scj