आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोध पत्रकारांच्या समूहाने परदेशातील गुप्त गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारांच्या सर्वात मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. परदेशातील या कंपन्या अथवा ट्रस्ट यांची संख्या १.२ लाख इतकी असून, त्याचा सविस्तर तपशीलही समूहाला मिळाला आहे. यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये ६१२ भारतीयांचा समावेश असून, त्यामध्ये लोकसभेतील काँग्रेसचे खासदार विवेकानंद गड्डाम आणि राज्यसभा सदस्य विजय मल्ल्या यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोण आहेत यात?
या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि बडय़ा कंपन्यांमध्ये राजकीय नेते, धनाढय़ आणि करचुकवे यांचा समावेश असून, त्यांनी ब्रिटिश व्हर्जिन बेटे, कूक बेटे, सामोआ आणि परदेशातील अन्य गुप्त ठिकाणी गुंतवणूक केली आहे. सदर कंपन्या अथवा ट्रस्ट हे १७० हून अधिक देशांमधील विविध कंपन्या आणि व्यक्तिगत मालकीच्या असून, त्यामध्ये भारतातील धनाढय़ांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. रविकांत रुईया, समीर मोदी, चेतन बर्मन, अभयकुमार ओसवाल, राहुल मम्मेन मप्पिलाई, जेता राजू, सौरभ मित्तल आणि विनोद दोशी यांचा समावेश यादीत आहे. प्राप्तिकर आणि सीबीआय अधिकाऱ्यांशी संबंध आलेल्या काही उद्योगपतींचाही या यादीमध्ये समावेश आहे. भारतीय रिझव्‍‌र्ह बँक आणि फेमा नियमांचे उल्लंघन करून यापैकी काही गुंतवणूक परदेशात करण्यात आली असण्याची शक्यता आहे.

कोणी केले उघड?
या व्यवहारांचा तपशील २.५ दशलक्ष गोपनीय फायलींमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोध पत्रकारांच्या समूहाने ही सर्व माहिती मिळविली आहे. ही माहिती विकिलिक्सने २०१० मध्ये फोडलेल्या महितीच्या जवळपास १६० पटीने अधिक आहे. सदर समूहाचे मुख्य केंद्र वॉशिंग्टन डीसी येथे असून, ती स्वतंत्रपणे कार्यरत आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या गुंतवणुकीबाबत हा समूह एकत्रित काम करीत आहे. सदर समूह जागतिक पातळीवरील ३८ मीडिया संघटनांशी संलग्न असून त्यामध्ये ‘दि इंडियन एक्स्प्रेस’चाही समावेश आहे. त्याचप्रमाणे द वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियन, बीबीसी, ला मांद आणि कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन यांच्याशीही संलग्न आहे.

नवे काय?
गोपनीय फायलींमध्ये वस्तुस्थिती आणि आकडेवारी तसेच रोख रकमेचे हस्तांतरण, कंपनी आणि व्यक्तींमधील संबंध याबाबत तपशील असून, त्यामुळे जागतिक पातळीवर आर्थिक गोपनीयता कशी फोफावली आहे ते स्पष्ट होते. अनेक प्रसिद्ध भारतीयांसह यादीमध्ये अमेरिकेतील डॉक्टर आणि दंततज्ज्ञ, मध्यमवर्गीय, पूर्व युरोपीयन आणि इंडोनेशियातील अब्जाधीश, रशियातील बडय़ा कंपन्यांचे अधिकारी व आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र दलाल यांचा समावेश आहे.संबंधितांनी सिंगापूरमधील पोर्टक्युलिस ट्रस्टनेट आणि ब्रिटिश व्हर्जिन बेटांवरील कॉमनवेल्थ ट्रस्ट लि. यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांची मदत घेतली आहे. परदेशात कंपनी स्थापन करण्यासाठी आणि वैयक्तिक पातळीवरील आर्थिक ट्रस्ट स्थापन करण्यासाठी त्याचप्रमाणे बँकेतील खात्यांचा सुगावा न लागण्यासाठी पोर्टक्युलिस आणि कॉमनवेल्थ कंपन्यांनी हजारो संबंधितांना मदत केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दृष्टिक्षेपात शोधमोहीम
*  जवळपास २.५ दशलक्ष फायलींमधील (दोन दशलक्ष ई-मेलसह) २६० जीबी डेटाचा १५ महिने तपास.
*  डेटामध्ये १.२ लाखांहून अधिक परदेशी कंपन्या आणि ट्रस्ट यांच्यासह १२ हजार दलालांचा समावेश.
*  परदेशी खाती आणि मालक १७० हून अधिक देश आणि प्रांतातील.
*  शोधमोहिमेत ४६ देशांमधील ३८ मीडिया संघटनेतील ८६ पत्रकारांचा समावेश.