पृथ्वीच्या ओझोन थराला पडलेल्या छिद्रामुळे ढगांचे आच्छादन व वाऱ्यांच्या दिशा बदलत असून त्यामुळे जागतिक तापमान वाढत आहे असे नवीन संशोधनात दिसून आले आहे.
आतापर्यंत असे मानले जाते की, ओझोनच्या थराला पडलेले छिद्र व जागतिक तापमानवाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिगचा निकटचा संबंध आहे त्यामुळे जगाचे सरासरी तापमान वाढत आहे. दुसरीकडे काही वैज्ञानिक यामुळे छोटय़ाशा प्रमाणात शीतकरण होते असेही मानतात. आता संगणकावरील मॉडेलच्या आधारे करण्यात आलेल्या संशोधनातून असे दिसून आले की, ओझोन छिद्रामुळे काही प्रमाणात तापमान वाढच होत आहे. वारे व तापमानात होणारे बदल यामुळे ही तापमानवाढ होत आहे.
नवीन संशोधनात असे दिसून आले की, ओझोन थरामुळे वाऱ्यांची दिशा बदलते त्यामुळे ढग दक्षिण ध्रुवाच्या फार जवळ जातात. त्यामुळे हे ढग कमी प्रमाणात प्रारणे परावर्तित करतात त्याचा परिणाम म्हणून शीतकरणापेक्षा तापमानवाढच होते. विशेषत धृवीय प्रदेशातील तपमानाबद्दल अंदाज वर्तविण्यासाठी हवामान शास्त्रज्ञांना सूक्ष्म बदलांची किंवा तपमानातील चढउतारांची माहिती असणे अतिशय आवश्यक असते. या संशोधनामुळे त्यांना मदत होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा