सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या ‘तेहलका’चा माजी संपादक तरुण तेजपालला आपल्या आजारी आईला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तेजपालची आई ब्रेन ट्युमरने ग्रस्त आहे. त्यामुळे आपल्या आजारी आईला भेटण्याची परवानगी तेजपालला द्यावी असे मागणीपत्र तेजपालच्या वकिलाने गोवा न्यायालयात दाखल केले होते. त्याबरोबर आई शकुंतला तेजपाल यांची वैद्यकीय प्रमाणपत्रेही न्यायाधीशांसमोर सादर करण्यात आली होती. यात आपली आई शेवटच्या घटका मोजत असल्याचे तेजपालने न्यायालयासमोर म्हटले.
अंतरावर शकुंतला तेजपाल यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तरुण तेजपाल असलेल्या कारागृहापासून जवळपास ५० किमी
अंतरावर हे रुग्णालय आहे. न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार, तेजपालला पोलीस बंदोबस्तात आपल्या आईला भेटता येणार आहे.  

Story img Loader