Goa government Suspended Paragliding Activities : आठवड्याभरापूर्वी महाराष्ट्रातील एका पर्यटकाचा गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गोवा सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. गोवा सरकारने आता राज्यभरातील पॅराग्लाडिंग उपक्रम स्थगित केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पर्यटन संचालक केदार ए नाईक यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पॅराग्लायडिंग उपक्रम (मोटर आणि नॉन-मोटर) पुढील आदेश येईपर्यंत संपूर्ण किनारपट्टी राज्यामध्ये तात्काळ स्थगित करण्यात आले आहे”.

Delhi assembly elections, Delhi assembly election news
गुगल मॅपनं दिला दगा, फ्रान्सच्या सायकलस्वारांना नेपाळ ऐवजी पोहोचवले…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य
Bengaluru Diwali Firecrackers accident
VIDEO: “फटाक्यावर बसला तर नवीकोरी रिक्षा घेऊन देऊ”; तरुणाला पैज भारी पडली, मृत्यूचा थरार कॅमेरात कैद
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?
PM Narendra Modi on Hindu Temple Attack in Canada
PM Modi on Temple Attack: कॅनडात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून कडक शब्दात निषेध, म्हणाले…
2 women marry each other
नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून, दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ
Sadhvi Pragya Sing Thakur
Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”

आदेशात म्हटले आहे की, पर्यटन विभाग आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी गोवा नोंदणी पर्यटन व्यापार कायदा, १९८२ अंतर्गत जारी केलेल्या सर्व विद्यमान नोंदणींचे पुनरावलोकन करेल. पॅराग्लायडिंग उपक्रमांमध्ये गुंतलेल्या सर्व ऑपरेटरने प्राधिकरणाकडे विहित कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. सर्व पोलीस अधिकारी आणि त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी व्यक्तींना या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत”, असे आदेशात म्हटले आहे. आदेशाचे पालन करण्यात अयशस्वी होणारी कोणतीही व्यक्ती, कंपनी, संघटना, फर्म किंवा इतर कोणतीही संस्था भारतीय न्याय संहिता अंतर्गत ५० हजार रुपये दंड कारवाईस पात्र असेल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात मृत्यू

गेल्या शनिवारी उत्तर गोव्यातील क्वेरीम येथे पॅराग्लायडिंगच्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील २७ वर्षीय पर्यटक आणि २६ वर्षीय पायलट यांचा मृत्यू झाल्यानंतर पॅराग्लायडिंग ऑपरेशन्स स्थगित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. १८ जानेवारी रोजी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान शिवानी डबळे हिने पायलट सुमन नेपाळीसोबत केरी पठारावरील खडकावरून उड्डाण घेतल्यानंतर दरीत कोसळली. उड्डाणाच्या मध्यभागी एक केबल तुटली होती, ज्यामुळे दोघांचा तोल गेला. परिणामी ते खडकावर आदळले आणि उंचावरून कोसळले.आवश्यक परवानग्या किंवा वैध परवाना न घेता पॅराग्लायडिंग ऑपरेशन्स चालवल्याप्रकरणी पोलिसांनी साहसी क्रीडा कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. पर्यटन विभागाने गेल्या आठवड्यात सांगितले की केरी पठारावर पॅराग्लायडिंग क्रियाकलापांसाठी विभागाकडून कोणतीही परवानगी किंवा मंजुरी देण्यात आलेली नाही.

राज्यातील सर्व पर्यटन-संबंधित संस्था सुरक्षिततेच्या नियमांचे आणि परवाना नियमांचे काटेकोरपणे पालन करतात का याची खात्री करण्यासाठी पर्यटन विभागाकडून चौकशी केली जाणार आहे.

Story img Loader