आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात सोमवारी मोठी घसरण झाली आणि सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमला २५ हजारांखाली उतरले. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वांत मोठी घसरण आहे. सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅममागे ५२४ रुपयांनी घसरले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे त्याचा परिणाम भारतातही जाणवला. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरातही कमालीची घसरण पाहायला मिळते आहे. त्याचाही परिणाम सोन्याच्या भावावर झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्याचबरोबर सध्या भारतीय बाजारात सोन्याला तुलनेत कमी मागणी असते. त्यामुळेही सोन्याच्या दरात घसरण झाली असल्याचे अभ्यासक सांगतात.

Story img Loader