नोव्हेंबर २,०१३ ते ऑक्टोबर २,०१४ या वर्षभराच्या कालावधीत मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीची १,१०२ प्रकरणे आढळल्याची माहिती संसदेत मंगळवारी देण्यात आली. हे सोने प्रामुख्याने संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, थायलंड, श्रीलंका, तैवान व इराण येथून प्रामुख्याने बेकायदेशीररीत्या आणण्यात आले होते, असे अर्थ विभागाचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत सांगितले. २५४.६३ कोटी रुपयांचे अंदाजे ९८५.५ किलो वजनी सोने या कालावधीत जप्त करून ३०२ इसमांना अटक करण्यात आल्याचे सिन्हा म्हणाले. या तस्करीत विमान कंपन्यांचे पाच व विमानतळावरील सात कर्मचारी गुंतले होते. त्यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी वाढली
नोव्हेंबर २,०१३ ते ऑक्टोबर २,०१४ या वर्षभराच्या कालावधीत मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीची १,१०२ प्रकरणे आढळल्याची माहिती संसदेत मंगळवारी देण्यात आली.
First published on: 17-12-2014 at 12:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold smuggling increased mumbai airport