‘अमेरिकन हसल’ या चित्रपटाने ७१व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांवर छाप पाडली. ‘सवरेत्कृष्ट विनोदी आणि संगीतमय चित्रपटा’चा पुरस्कार या चित्रपटाने मिळवला, त्याशिवाय या चित्रपटातील नायिका अॅमी अॅडम्स हिला सर्वोत्तम अभिनेत्री (विनोदी आणि संगीतमय चित्रपट) आणि जेनिफर लॉरेन्स हिला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला.
अॅमी अॅडम्सने या चित्रपटात एका धूर्त नायिकेची भूमिका केली असून, या अभिनयाला प्रेक्षकांनी मोठी दाद दिली होती. ‘हा पुरस्कार घेताना मला खूपच भय वाटत आहे. का ते माहीत नाही,’ असे सांगून अॅडम्सने या चित्रपटाचे दिग्दर्शक डेव्हिड रसेल यांचे आभार मानले. जेनिफर लॉरेन्सला तर प्रथमच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला असूनन, या पुरस्कारने आनंद झाल्याचे तिने सांगितले.
सवरेत्कृष्ट अभिनेता (विनोदी आणि संगीतमय चित्रपट) हा पुरस्कार लिओनार्दो डिकॅप्रो यांना त्यांच्या ‘द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ या चित्रपटासाठी मिळाला. डिकॅप्रो यांना पाचव्यांदा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला असून, विनोदी अभिनेत्याच्या विभागात दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कारांची यादी
* सवरेत्कृष्ट चित्रपट : ट्वेल इयर्स अ स्लेव्ह
* सर्वोत्तम अभिनेता : मॅथ्यू मॅककॉनघे (डल्लास बायर्स क्लब)
* सर्वोत्तम अभिनेत्री : केट ब्लॅनचेट (ब्लू जॅस्मिन)
* सर्वोत्तम दिग्दर्शक : अल्फान्सो क्युरॉन (ग्रॅव्हिटी)
* सवरेत्कृष्ट विनोदी चित्रपट : अमेरिकन हसल
* सर्वोत्तम विनोदी अभिनेता : लिओनार्दो डिकॅप्रो (द वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट)
* सर्वोत्तम विनोदी अभिनेत्री : अॅमी अॅडम्स (अमेरिकन हसल)
* सवरेत्कृष्ट परदेशी चित्रपट : दि ग्रेट ब्युटी